1. सहारानं नरेंद्र मोदींना 6 महिन्यात 40 कोटी दिले, मेहसाण्यातील सभेत राहुल गांधींचा गंभीर आरोप, तर मोदी गंगेइतकेच पवित्र, भाजपचं राहुल यांना प्रत्युत्तर
2. नोटाबंदीच्या 44 दिवसात केंद्र सरकारची 61 ठिगळं, केवायसी असेल तर कितीही पैसे बँकेत भरण्याची मुभा, जेटलींच्या घोषणेनंतर 24 तासात यू टर्न
3. पुणे मेट्रोच्या श्रेयवादाच्या लढाईत काँग्रेसची उडी, 23 तारखेला भूमिपूजनचा इशारा, तर राष्ट्रवादी-भाजपमधला वाद शमवण्यात मुख्यमंत्र्यांना यश
4. अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाला मच्छिमारांचा विरोध कायम, मोदींसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
5. 206 कोटी रुपयांच्या चिक्की घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडेंना क्लीन चिट, सबळ पुरावे नसल्याचा एसीबीचा रिपोर्ट, क्लीन चिटनंतर पंकजांचा राष्ट्रवादीवर निशाणा
6. ठाण्यात युरेनियम सदृश्य पदार्थाचा साठा जप्त, 24 कोटींचा साठ्यासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात, तस्करी होत असल्याचा संशय
7. डोंबिवलीत बिल्डर समजून अंगरक्षकाची गोळ्या झाडून हत्या, मनसेचे माजी आमदार रमेश पाटलाच्या भावावर गोळीबार केल्याचा आरोप, हल्लेखोर फरार
8. मातीतल्या लेखकाचं साहित्य अकादमीकडून कौतुक, आसाराम लोमटेंच्या 'आलोक' लघुकथासंग्रहाची पुरस्कारासाठी निवड, 22 फेब्रुवारीला होणार पुरस्कार वितरण