एक्स्प्लोर

संभाजी भिडेंसह अनेक राजकीय नेत्यांवरील गंभीर गुन्हे मागे : RTI

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी 2008 पासून मागे घेण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली होती. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

मुंबई : फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम 321 नुसार राज्य सरकारला अधिकार आहे की काही साधारण केसेसमध्ये दाखल गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात. पण 7 जून 2017 पासून ते 14 सप्टेंबर 2018 पर्यंत फडणवीस सरकारकडून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह इतर नेत्यांवर दाखल अनेक गंभीर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी राज्याच्या गृह विभागाकडून 2008 पासून किती नेते आणि सामान्य लोकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यात आले, याची माहिती मागवली होती. गृह विभागाच्या माहितीनुसार, जून 2017 मध्ये संभाजी भिडे आणि त्यांच्या साथीदारांवरचे तीन गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. इतर माहिती जमा केल्यानंतर आणखी तीन गुन्हे मागे घेण्यात आल्याचं समोर आल्याचा दावा शकील अहमद शेख यांनी केलाय. 2008 पासून 2014 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं आघाडी सरकार सत्तेत असताना एकाही व्यक्तीवर दाखल गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत, असंही शकील अहमद शेख यांनी म्हटलंय. मात्र 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जून 2017 पासून 14 सप्टेंबर 2018 पर्यंत 8 शासन निर्णय आणून एकूण 41 दाखल गुन्ह्यांमध्ये हजारोंच्या संख्येत आरोपींवरचे गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. त्यातही संभाजी भिडे व्यतिरिक्त भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. या नेत्यांवरील गुन्हे मागे राजू शेट्टी आणि इतर (खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना) दोन गुन्हे संजय घाटगे आणि इतर (माजी भाजप आणि शिवसेना नेता) निलम गोऱ्हे (शिवसेना आमदार) आणि मिलिंद नार्वेकर संजय बाळा भेगडे आणि कार्यकर्ते (भाजप आमदार) प्रशांत ठाकुर आणि कार्यकर्ते (भाजप आमदार, सध्या सिडकोचे अध्यक्ष) विकास मठकरी आणि कार्यकर्ते (भाजप आमदार) अनिल राठोड आणि कार्यकर्ते (शिवसेने नेते) दोन गुन्हे अभय छाजेड आणि कार्यकर्ते (काँग्रेस नेते) अजय चौधरी आणि कार्यकर्ते (शिवसेना आमदार) डॉ. दिलीप येलगावकर आणि कार्यकर्ते (भाजप आमदार) आशिष देशमुख कार्यकर्ते (भाजप आमदार) किरन पावसकर (विधान परिषद आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस) एकूण 41 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, ज्यात दंगल, शासकीय संपत्तीला नुकसान पोहोचविणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यासारखे गंभीर गुन्हे आहेत . कायदा हा सर्वांसाठी समान असतो. मग गेल्या चार वर्षात सामान्य व्यक्तीवरील एकही गुन्हा मागे घेण्यात आलेला नसताना राजकीय नेत्यांनाच क्लीन चिट का, असा सवाल शकील अहमद शेख यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस अन् विखे पाटील आपल्याला फसवतायत, भाजप सरकार असेपर्यंतच मराठा समाजाच SEBC आरक्षण टिकणार; मराठा सेवा संघाचा आरोप, मनोज जरांगेंवरही टीका
देवेंद्र फडणवीस अन् विखे पाटील आपल्याला फसवतायत, भाजप सरकार असेपर्यंतच मराठा समाजाच SEBC आरक्षण टिकणार; मराठा सेवा संघाचा आरोप, मनोज जरांगेंच्या भूमिकेवरही टीका
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget