युतीसोबत फारकत घेत रिपाइं आठवले गटाने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली आहे. विशेष म्हणजे उल्हासगर महापालिकेसाठी शिवसेने रिपाइंसाठी 13 जागा सोडल्या आहेत.
ओमी कलानींची हातात तलवार घेऊन स्टेजवर एन्ट्री
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने भाजप आणि कलानीपुत्राच्या गटात युती झाली आहे. शिवसेने इथेही स्वबळावर लढणार असल्याने भाजपला कलानी आणि रिपाइंची ताकद मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं.
परंतु शिवसेनेने 13 जागा सोडल्याने रिपाइंने भाजप आणि टीम ओमी कलानींना दूर सारुन धक्का दिला आहे. त्यामुळे आता या महापालिका निवडणुकीची रंगत वाढली आहे.
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला झटका, कलानी-भाजप-रिपाइं युती
21 फेब्रुवारीला उल्हासनगर महापालिकेसाठी मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी होणार आहे.