Rohit Pawar : ठाकरेच नव्हे तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्मासाठी एकत्र यावे; अजितदादांना टॅग करत रोहित पवारांची पोस्ट

Rohit Pawar Tweet : मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंबीय एकत्र येत असतील तर तो सुवर्णक्षण असेल असं आमदार रोहित पवार म्हणाले.

Continues below advertisement

मुंबई : एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत येण्याची चर्चा सुरू असतानाच रोहित पवारांच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर तो मराठी मनासाठी सुवर्णक्षण असेल. ठाकरेच नव्हे तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यावं असं रोहित पवार म्हणाले. विशेष म्हणजे रोहित पवारांनी या पोस्टमध्ये राज-उद्धव यांच्यासोबत शरद पवार आणि अजित पवारांनाही टॅग केलं आहे. 

Continues below advertisement

काय म्हणाले रोहित पवार? 

मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत आहे.

 

ठाकरे बंधू एकत्र येणार? 

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी एक चर्चा असते ती म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? ही आता ही चर्चा गंभीर वळणावर गेली आहे. त्याचं कारण खुद्द राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि एकत्र येण्याचे संकेत दिलेत. त्यांच्या या टाळीला उद्धव ठाकरे यांनीही वेळ न दवडता तात्काळ प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आणि क्षुल्लक आहेत, अशा निसंदिग्ध शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना संकेत दिले. त्याहीपुढे जात एकत्र येणं हे कठीण नाही, पण प्रश्न इच्छेचा आहे असं राज ठाकरे म्हणाले. महेश मांजरेकर यांच्या यूट्यूबवरील मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. 

राज ठाकरे यांच्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देणार याची उत्सुकता होती. राज यांची मुलाखत प्रसारित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी यावर उत्तर दिलं. आपल्याकडून भांडण नव्हतं, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायलाही तयार आहोत असं उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं. पण त्यासोबतच राज ठाकरेंसमोर एक अटही ठेवली. भाजपसोबत जायचं आहे की आपल्यासोबत ते ठरवा. महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याच्या पंक्तीला बसणार नाही, याचा निर्णय घ्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

 

ही बातमी वाचा: 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola