सुप्रिया ताईंनी हात धरून मध्यभागी आणलं, अमित- आदित्यनंही हस्तांदोलन करत दिली खास पोझ, स्टेजवर नेमकं घडलं काय? Photos

एन्ट्रीला आपले ठाकरे गाणं वाजलं आणि फक्त वरळी डोमच नाहीतर अख्खा महाराष्ट्राच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले.

Continues below advertisement

amit Aditya Thackeray

Continues below advertisement
1/8
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन्ही शासकीय आदेश रद्द करण्याच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी ठाकरे बंधू आज एकाच मंचावर दिसले .
2/8
वरळी डोम येथे पार पडलेल्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधूंनी आपापल्या भाषणांमधून सत्ताधार्‍यांचा खरपूस समाचार घेतला .
3/8
विजय मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटोही काढले .यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला .
4/8
फोटो काढताना मंचावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह जितेंद्र आव्हाड, यांच्यासह काही मंडळी उपस्थित होती .
5/8
बाजूला अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे थांबल्याचं पाहून सुप्रिया सुळे यांनी दोघांचे हात धरून त्यांना मध्ये आणलं .
Continues below advertisement
6/8
वरळी डोम येथे झालेल्या भव्य दिव्य मेळाव्यात ठाकरे बंधूंनी एकत्र येत गळाभेट घेतल्यानंतर शेवटी राज -उद्धव यांच्या पुढच्या पिढीने म्हणजेच अमित आणि आदित्य ठाकरे यांनीही एकमेकांशी हस्तांदोलन केलं
7/8
नंतर पुढे येऊन खास एकत्र उभा रहात दिलेली पोजही लक्षवेधी ठरली .
8/8
या मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी झाली होती .राजकारणाची पुढची दिशा बदलण्याची ताकद असलेला हा मेळावा ठाकरे बंधूंच्या राजकारणाला नव वळण देणारा असल्याचं दाखवून गेला .
Sponsored Links by Taboola