Rohit Pawar on Ajit Pawar: विधानपरिषद निवडणुकांच्या (Vidhan Parishad Election) तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित दादांच्या नेत्यांचं भाजपशी आधीच सेटिंग झालं असेल, दादांचा आमदारांवर विश्वास नाही,असं वक्तव्य केलंय. विधान परिषदेला अजित पवारांसोबत दगाफटका होईल असा खळबळजनक दावाही त्यांनी केलाय.


यापूर्वीही आमदार रोहित पवारांनी असा दावा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत सिद्धिविनायक दर्शन घेतल्यानंतर रोहित पवारांनी विधान परिषदेत अजित दादांना दगाफटका होणार असल्याचे सांगत 'दादा इमेजवर हल्ली अधिक खर्च करत आहेत', अशी टीकाही केली होती. 


ऑन हॉटेल पॉलिटिक्स


विधान परिषदेत आपल्या आमदारांची मते फुटू नयेत यासाठी तसेच आमदार मतदानासाठी वेळेत पोहोचावेत यासाठी राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना सुरक्षितस्थळी ठेवले आहे. यात अजितदादांच्या नेत्यांचं भाजपसोबत सेटिंग आधीच झाली असेल, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी पवारांवर टीका केली. 


गुजरातच्या इलेक्शनचा भाजपचा खर्च समृद्धी महामार्गाच्या खर्चातून


समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या टेंडर भ्रष्टाचार प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. गुजरात इलेक्शनचा भाजपचा खर्च समृद्धी महामार्गाच्या खर्चातूनच झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.


समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचारात 23 कंपन्यांचा सहभाग होता. काही दिवसांपूर्वी समृद्धी भ्रष्टाचाराविषयी मी बोललो होतो. या प्रकल्पातून काही मंत्री आणि अधिकाऱ्यांना लाभ मिळालेला असावा असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली.


पुणे रिंग रोडसाठी कुणाकुणाच्या जमिनी वाढीव भावात घेतल्या ?


भ्रष्टाचार किंवा अतिरिक्त पैसा हा सरकारचाच गेला आहे.त्यामुळे केंद्र सरकारने आता प्रकल्प थांबवलाय. पुणे रिंग रोड साठी 16 हजार कोटी ते 22 हजार कोटींपेक्षा अधिक टेंडर देण्यात आलं होतं. या रोड साठी कोणाकोणाच्या जमिनी सरकारने वाढीव भावात घेतल्या, याचा अभ्यास करण्याची गरज आहे . हा विषय काल आमच्या समोर आला होता जो मी आज म्हणून दाखवला आहे,असेही रोहित पवार म्हणाले.


पूजा खेडकर प्रकरणी सरकारने लक्ष घालावे


सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी(Puja Khedkar) शासनाने शहानिशा करावी.कागदपत्रांची फेरफार करून काही लोक अधिकाधिक मोठे झाले असतील आणि तसे रिपोर्ट असतील तर सरकारने याबाबत लक्ष घालण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. सामान्य कुटुंब खूप कष्ट घेतात पण तरीही सरकारी नोकर भरती मध्ये त्यांना जाता येत नाही. त्यामुळे यावर योग्य ती कारवाई करावी असेही ते म्हणाले.


हेही वाचा:


Maharashtra Assembly Election 2024: लोकसभेच्या निकालापासून धडा घेतला, भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जागांचा आकडा ठरवला, 170 जागा लढवणार?