Rohit Pawar on Ajit Pawar: विधानपरिषद निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सिद्धिविनायक मंदिरात (Siddhivinayak Mandir)दर्शन घेत शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसून आलं. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत अजित दादांना दगाफटका होईल. दादा 'इमेज बिल्ड'वर हल्ली जास्त खर्च करत आहेत. दादांनी केसांचा भांग कसा पाडायचा हे देखील अरोरा ठरवणार अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. 


आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतील आमदारांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी दर्शन घेऊन सर्व आमदार पावसाळी अधिवेशनासाठी विधिमंडळात पोहोचल्याचे दिसले. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदारांमधील एकजूट दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. दरम्यान, 14 जुलैला बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी सभा होणार आहे. 


दादा इमेज बिल्डर हल्ली जास्त खर्च करतात: रोहित पवार 


सिद्धिविनायक दर्शनानंतर आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत अजित दादांना दगाफटका होईल. दादा इमेज वर हल्ली जास्त खर्च करतात. यासाठी एका कंपनीला त्यांनी 200 कोटी दिलेत, असे ते म्हणाले. 


भांग कसा पाडायचा हेही आता 'आरोरा' ठरवणार 


अजितदादा सध्या इमेज बिल्डवर अधिक खर्च करतात. बॉक्स नावाच्या कंपनीला त्यांनी केवळ इमेज बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्ट दिलंय. या कंपनीत काम करणाऱ्या अरोरा नावाच्या व्यक्तीला इमेज बिल्ड करण्यासाठी 200 कोटी दिले आहेत.


अरोरानं सांगितलं असेल मंदिरात जाऊन दर्शन घ्या म्हणून मीडियाला सांगून भपका करत तुम्ही मंदिरात जाता. दादांनी कपडे कोणते घालायचे,भांग कसा पाडायचा , कसं बोलायचं हेही 'अरोरा' ठरवणार आहेत, असे म्हणत सिद्धिविनायक दर्शनावरून आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकेची झोड उठवली.


हाय प्रोफाईलवाल्यांचे सरकार


वरळीच्या घटनेवरून हे सिद्ध होतं की हे सरकार सर्वसामान्यांचं नाही. हाय प्रोफाईलवाल्यांचे सरकार आहे. हाय प्रोफाईल वाल्यांना कायदा लागू होत नाही तो फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे, असा घणाघात रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.


हेही वाचा:


Worli Hit And Run : वरळी सी लिंकवर मिहीर शहानं सीट बदलली अन् BMW कारनं कावेरी नाखवांना पुन्हा चिरडलं; धक्कादायक माहिती समोर


Worli hit and run: कावेरी नाखवांना गाडीखाली चिरडणारा मिहीर शहा पळून का गेला, कधी सापडणार? रोहित पवारांनी सांगितली धक्कादायक थिअरी