Rohit Pawar ED Enquiry Live : रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर न आल्यास बॅरिकेट्स काढून कार्यालयात घुसण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा

Rohit Pawar ED Enquiry Live: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत .

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jan 2024 04:45 PM
Rohit Pawar ED Enquiry : रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर न आल्यास बॅरिकेट्स काढून कार्यालयात घुसण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा

राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते रोहित पवार यांच्यासाठी आक्रमक. 


रोहित पवार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बाहेर येतील असं नेत्यांचं आश्वासन.


रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर न आल्यास बॅरिकेटिंग काढत ईडी कार्यालयाकडे जाण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा. 


पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान.

Supriya Sule:  सत्यमेव जयते! सत्याचा विजय होणार : सुप्रिया सुळे

Supriya Sule:  सध्याचा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. परंतु मला खात्री आहे की, सत्याचा विजय होणार आहे. आव्हानांवर मात करून आम्ही विजय मिळवू,अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना ईडी कार्यालयात सोडल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. 

Rohit Pawar: रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल

Rohit Pawar: ईडी चौकशीअगोदर रोहित पवारांनी शरद पवारांचा आशिर्वाद घेत ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. ईडी कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात आली आहे. 





Rohit Pawar: ईडी चौकशीअगोदर रोहित पवार राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात

Rohit Pawar: ईडी चौकशीअगोदर रोहित पवार राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात पोहचले आहेत. 

Rohit Pawar: रोहित पवारांच्या फाईलवर सर्व महापुरुषांचे, समाजसुधारकांचे फोटो

Rohit Pawar: रोहित पवार ईडी कार्यालयात जी फाईल घेऊन जात आहेत. त्यावर महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांचे, समाजसुधारकांचे फोटो लावले आहेत. त्यावर विचारांचा वारसा असेही लिहिले आहे. 

 Rohit Pawar: महाराष्ट्राचा बुलंद आवाज... शरद पवार, राष्ट्रवादीच्या कार्यलयाबाहेर जोरदार घोषणाबाजी

 Rohit Pawar:  राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर शरद पवार दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज... शरद पवार, एकच वादा रोहित दादा... अशा घोषणा देण्यात आल्या आहे. 

Sharad Pawar: शरद पवार थोड्याच वेळात राष्ट्रवादी कार्यालयात

Sharad Pawar: शरद पवार थोड्याच वेळात राष्ट्रवादी कार्यालय येथे पोहोचणार आहेत. 

Rohit Pawar: घाबरु नका, ED चौकशीआधी रोहित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन

Rohit Pawar:  ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वी सहकार्य केलं. तसंच आताही करणार मात्र सूडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर
सरकारचा दबाव आहे. दबावाखाली माझ्यावर ईडीने चुकीची कारवाई केल्यास घाबरुन जाऊ नये.  पवार साहेबांसोबत सर्वांनी एकजुटीने उभं राहावं, असे आवाहन रोहित पवारांनी केले आहे. 

रोहित पवारांची आज ईडी चौकशी, कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर गर्दी

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर गर्दी आहे.  ईडीविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. 

Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी

Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवारांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत.

पार्श्वभूमी

मुंबई: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) चौकशीसाठी ईडी कार्यालयात (Rohit Pawar ED Enquiry Live)  दाखल झाले आहेत . त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवारांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन केले आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला गेल्य होत्या. दरम्यान चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. चोकशीअगोदर रोहित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा आशीर्वाद घेतला. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.