Rohit Pawar : तपास यंत्रणांच्या मदतीनं विरोधी पक्षातील नेते फोडायचे ही भाजपची (BJP) जुनी रणनीती आहे. आता हीच सवय भाजपच्या सहकारी पक्षांची सुद्धा बनली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी केलं. दबाव टाकण्यासाठीच बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील (K.P.Patil) यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) खोटी कारवाई केली आहे. या कारवाईचा जाहीर निषेध असल्याचे रोहीत पवार म्हणाले. 


नेमकं प्रकरण काय?


कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अचानक तपासणी करण्यात आली. विशेष पथकाने कारखाना कार्यस्थळावर डिस्टलरी प्रकल्पाच्या कामाची तसेच मान्यतेच्या कागदपत्रांची तपासणी केली. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात खळबळ उडाली असून या तपासणीबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. बिद्री साखर कारखान्याच्या प्रतिदिन साठ हजार केएलपीडी क्षमतेच्या डिस्टलरी प्रकल्पाची उभारणी सुरु आहे. सुमारे 130 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सुरवातीपासूनच सत्ताधारी व विरोधी गटाच्या आरोप-प्रत्यारोपांनी चर्चेत आहे. अशातच आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी डिस्टलरी प्रकल्पावर धाड टाकून तपासणी केली आहे. याच मुद्यावरुन रोहीत पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय.  


सत्ताधाऱ्यांच्या दबावाला स्वाभिमानी मराठी माणूस कधीही बळी पडणार नाही 


माझ्यावरही अशाच प्रकारे प्रदूषण नियंत्रण बोर्ड, ईजीच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता. एवढे होऊनही मी सरकारच्या विरोधात बोलायचे थांबवत नाही, म्हणून माझ्या आणखी एका कारखान्यावर कारवाई करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरु आहेत. कदाचित लवकरच कारवाई केली जाईल. पण सत्ताधाऱ्यांच्या या दबावाला स्वाभिमानी मराठी माणूस कधीही बळी पडला नाही आणि पडणारही नाही असे रोहीत पवार म्हणाले. आता सरकारचे तीन ते चार  महिने राहिले आहेत. त्यामुळं सरकारनं तपास यंत्रणाच्या माध्यमातून खोटी कारवाई करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याच काम केलं, तर ते योग्य ठरेल, असेही रोहीत पवार म्हणाले. 


के. पी. पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा


दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे विजयी झाल्यानंतर भुदरगड तालुक्याच्या आभार दौऱ्यावर आले होते. यावेळी बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी खासदार शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांचे जोरदार स्वागत केले होते. यांमुळे के. पी. पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Ajit Pawar camp NCP: मोठी बातमी: अजितदादा गटाला कोल्हापुरात मोठा झटका? माजी आमदार के पी पाटील मविआच्या वाटेवर