अहमदनगर : विहिरीत पडलेल्या बिबट्याला (Leopard) वन विभागाचे (Forest Department) पथक बाहेर काढताना पिंजरा मोडकळीस आलेला असल्याने बिबट्याने पिंजरा तोडून परिसरातील शेतात धूम ठोकली आहे. हा प्रकार कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील भोजडे शिवारातील घनगाव वस्ती येथे घडला आहे. 


वनविभागाच्या गलथान कारभारामुळे प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही मात्र वन विभागाच्या कामकाजावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोखंडी पिंजरा आणण्याऐवजी मोडकळीस आलेला लाकडी पिंजरा का आणला? असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. 


पिंजरा तोडून बिबट्या सिनेस्टाईल फरार 


कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील घनघाव वस्ती येथे गौतम घनगाव यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली होती. गावकऱ्यांनी बिबट्याचा जीव वाचायला हवा, यासाठी विहिरीमध्ये दोरीच्या साह्याने बाज टाकली जेणेकरून बाजीच्या सहाय्याने बिबट्याला पाण्यात बुडण्यापासून वाचवता येईल आणि बिबट्याला सुखरूप वन विभागाकडे सोपवता येईल. मात्र वनविभागाने आणलेला निकृष्ट दर्जाच्या पिंजऱ्यामुळे थेट पिंजरा तुटल्याने बिबट्या सिनेस्टाईल फरार झाला. 


बागलाण तालुक्यात बिबट्या जेरबंद


बागलाण तालुक्यातील महड येथील शेतीशिवारात सावजची शिकार करताना बिबट्या थेट कोरड्या विहिरीत पडल्याची घटना गुरूवारी घडली. संबधित शेतकरी शेतात काम करीत असतांना विहिरीत बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील आधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Pune : पुण्यात आमदाराच्या गावातील मुलावर बिबट्याचा हल्ला; दबा धरून बसलेल्या बिबट्यानं थेट अंगावर झेप घेतली


Pune Leopard News : पुणेकर बिबटे आता 'गुजराती' होणार; केंद्र सरकारने परवानगी दिल्याचा वन विभागाचा दावा