Rohini Khadse जळगावआजघडीला रक्षा खडसे (Raksha Khadse) एकट्या आहेत. कदाचित एकनाथ खडसे यांनी सासरे म्हणून सून रक्षा खडसे यांच्या बद्दलच्या जबाबदारीपोटी वेगळा निर्णय घेतला असावा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मला मुलगी म्हणून सोबत येण्याबद्दल विचारणा केली होती, मात्र मी त्यांना स्पष्ट नकार दिला. आज माझी ओळख  शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुळे आहे. मी शरद पवारांच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी एकनाथ खडसेंच्या भाजप (BJP) पक्ष प्रवेशाबद्दल रोखठोक मत व्यक्त केलंय.  


भविष्यात काय होईल सांगता येत नाही- रोहिणी खडसे


ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यादेखील भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा होती. मात्र त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणे पसंत केले आहे. परंतु, एकनाथ खडसे यांचा भाजप पक्षप्रवेश का थांबला आहे. याबाबत रोहिणी खडसे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, यासंदर्भात एकनाथरावच योग्य पद्धतीने सांगू शकतील. त्यांच्या पक्षांतर्गत बाबी बद्दल मी बोलणं योग्य नाही.


एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश का थांबला आहे, सध्या काय होतंय किंवा भविष्यात काय होईल. या संदर्भात मी त्यांना कधी विचारना केली नाही. जेव्हाही रक्षा खडसे आणि मी भेटतो त्यावेळी आम्ही कधीच राजकारणावर चर्चा करत नाही. घरात आल्यानंतर आम्ही फक्त एक कुटुंब असतो. राजकीय चपला आम्ही बाहेर ठेवून घरात जातो. घरी आम्ही फक्त नातं जोपासतो, कौटुंबिक चर्चा करतो. तेव्हा त्या फक्त माझ्या वहिनी असतात आणि मी त्यांची नणंद असते. असे स्पष्ट मत रोहिणी खडसे यांनी बोलताना व्यक्त केलंय. 


शरद पवार यांच्या नेतृत्वामध्येच काम करेल- रोहिणी खडसे


एकनाथ खडसे खूप भावनिक आहेत. ते स्वार्थ पाहत नाही. भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय सुनेबद्दलच्या जबाबदारीमुळे घेतला आहे. जर निखिल खडसे आज हयात असते तर कदाचित एकनाथ खडसे यांना असा निर्णय घेण्याची गरज वाटली नसती. कदाचित आज त्यांना सुनेला एकटं सोडून देणे योग्य वाटत नसेल. एकनाथ खडसे यांनी जेवढं राजकीय काम केलं आहे, त्यामुळे त्यांना राजकीय निर्णयासाठी माझ्या सल्ल्याची गरज नाही. ते त्यांचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत.


जेव्हा एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हा त्यांनी मुलगी म्हणून काळजीपोटी मला सोबत येण्याबद्दल विचारणा केली होती. तेव्हा मी त्यांना मी तुमच्या सोबत येणार नाही. मी शरद पवार यांच्या नेतृत्वामध्येच काम करेल, सोबत भाजपमध्ये येऊ शकत नाही, असे सांगितले आणि त्यानंतर आम्ही दोघांमध्ये चर्चा झाली नाही. त्यांनी मला राजकीय निर्णय घेण्याचा स्वातंत्र्य दिले असल्याचेही रोहिणी खडसे म्हणल्या.


इतर महत्वाच्या बातम्या