Raksha Khadse जळगाव : नाथाभाऊ कौटुंबिक सदस्य असले, तरी मधल्या काळात ते राष्ट्रवादीत होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आणि आता ते माझ्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहेत. गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सोबत काम करणं या क्षेत्रासाठी चांगले आहे. त्यांनी एकमेकांवर टीका करणे, एकमेकांच्या विरोधात काम करणं आमच्यासारख्या नव्या पिढीसाठी चांगले नाही, असे वक्तव्य रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी केले आहे. 


रक्षा खडसे म्हणाल्या की, आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास आहे. दोन्ही कार्यकाळात आम्ही भक्कम काम केलंय, म्हणून मतदार यंदाही आशीर्वाद देतील. मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. रावेरमध्ये 65 टक्के मतदान झाले पाहिजे. संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजवावा, असे त्यांनी म्हटले.


नाथाभाऊ पूर्ण ताकदीने काम करताय 


निवडणूक कोणतीही असो, सर्वांचे सहकार्य आवश्यक असते. नाथाभाऊ माझ्या कुटुंबाचे सदस्य असले तरी ते मधल्या काळात राष्ट्रवादीत गेले होते. मात्र निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आणि आता ते माझ्यासाठी या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने काम करत आहेत. नाथाभाऊंचा पक्षप्रवेश केव्हा होईल हे तेव्हाही नाथाभाऊंनी सांगितलेलं नव्हते. मीडियानेच फक्त अंदाज बांधले होते. निवडणुकीपूर्वी ते बोलले की मी भाजपमध्ये येणार आहे. आता पक्ष संघटना आणि नेतृत्व त्याबद्दल निर्णय घेतील.  


महाजन आणि नाथाभाऊंनी सोबत काम केले तर चांगलेच


राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? याबाबतचे उत्तर नाथाभाऊच योग्य पद्धतीने देऊ शकतील. गिरीश महाजन आणि नाथाभाऊ सोबत येऊन काम करत असतील, तर ते चांगलंच आहे. त्यांनी एकमेकांवर टीका करणे, एकमेकांच्या विरोधात काम करणं आमच्यासारख्या नव्या पिढीसाठी चांगले नाही, असे त्यांनी म्हटले. 


ही निवडणूक देशाचे भवितव्य घडवणारी


माझ्या विरोधातले उमेदवार श्रीराम पाटील यांनी तीन महिन्यात तीन पक्ष बदलले आहे. ते स्वतःच्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवत आहे. मात्र ही निवडणूक देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. मुळात देशाचा नेतृत्व कोण करेल, यासाठीची ही निवडणूक आहे आणि त्यामध्ये मी एक माध्यम आहे, असे रक्षा खडसे म्हणाल्या. 


आणखी वाचा 


Raksha Khadse : रावेर लोकसभेत मोठा ट्विस्ट, रक्षा खडसे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटलांच्या भेटीला, नेमकी काय झाली चर्चा?