Maharashtra Weather Update News : राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसाचा काही भागात शेती पिकांना (Agriculture Crop) देखील फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आलाय. दरम्यान, या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. जाणून घेऊयात हवामानाविषयी सविस्तर माहिती.  


'या' भागात पडणार वादळी पाऊस


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (Imd), राज्याच्या विविध भागत अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकणातील काही भागात जोरजार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता


दरम्यान, कोकणाबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. 


पावसाच्या अंदाजामुळं मतदान सकाळीच करावं


दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस जोरदार वादळी पावसाची शक्यता कायम आहे. 12 ते 13 मे या काळात अहमदनगर नाशिक पुणे सातारा बीड परभणी जालना छत्रपती संभाजी नगर या भागात दुपारनंतर जोरदार ते मुसळधार वादळी विजांसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी व्यक्त केलाय. तर 13 मे रोजी वरील जिल्ह्यातील काही ठिकाणी मतदान असल्यामुळं शक्यतो सकाळी लवकर मतदान करणे गरजेचं आहे. दुपारनंतर वादळी पाऊस काही भागात असल्यामुळं शक्यतो मतदान सकाळीच करावे असं आवाहन करण्यात आलं आहे.


महत्वाच्या बातम्या:


राज्यात अजून किती दिवस राहणार अवकाळीचा जोर? कुठं कुठं पडणार पाऊस? सविस्तर माहिती एका क्लिकवर