Sangli Crime : मिरज तालुक्यातील समडोळी येथे भाडेकरू पर्यटनासाठी गेल्याची संधी साधत बंद घराचा कडीकोयंडा तोडून 15 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिने व रोख रकमेसह 15 लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.


चोरट्यांनी 25 तोळे सोने, एक किलो चांदी, 70 हजारांची रोकड असा 15 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. समडोळीतील नागरी वस्तीत असलेल्या एका मंदिरा नजीकच्या घरामध्ये भाडेकरू म्हणून सन 2013 पासून वास्तव्यास असलेले डॉक्टर प्रणय अशोक कौलापूरे हे सोमवारी सकाळी कुटुंबासह पर्यटनासाठी गेले होते. तथापि घरमालक हे कामानिमित्त आले असताना त्यांना डॉक्टर कौलापुरे यांच्या घराचा कडीकोयंडा अज्ञाताने उचकटल्याचे निदर्शनास आले. 


त्यांनी ही बाब डॉक्टर कोल्हापूरे यांच्या नातेवाईकांना दुरध्वनीवरून दिल्यानंतर त्यांनी परिस्थितीची खातरजमा करुन सांगली ग्रामीण पोलीसा,त अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे.


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.


महत्त्वाच्या इतर बातम्या :