HSC Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. मागील वर्षी म्हणजे 2021 मधे कोरोनामुळे बारावीची परीक्षा न होता अंतर्गत मुल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले होते. तर त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 90.66 टक्के लागला होता. तर यावर्षीचा निकाल 94.22 टक्के आहे. म्हणजे मागील वेळेपेक्षा यावर्षी बारावीचा निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे.


राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा आहे. याशिवाय यंदा निकालात मुलींनी बाजी मारली. तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 95.24 टक्के आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे.


विभागनिहाय निकाल 
कोकण - 97.22 टक्के 
पुणे - 93.61 टक्के 
कोल्हापूर - 95.07 टक्के 
अमरावती - 96.34 टक्के 
नागपूर - 96.52 टक्के
लातूर -  95. 25 टक्के
मुंबई - 90.91 टक्के
नाशिक - 95.03 टक्के
औरंगाबाद - 94.97 टक्के


निकालात मुलींची बाजी
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 95.35 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 93.29 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 


95.24 टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
या परीक्षेत राज्यातील 5001 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 95.24 टक्के आहे.


मार्च- एप्रिल 2022 विषयनिहाय निकाल 
1. विज्ञान- 98.30 टक्के
2. कला -  90.51 टक्के
3. वाणिज्य- 91.71 टक्के
4. व्यवसायिक अभ्यासक्रम- 92.40 टक्के


या परीक्षेतील 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.


राज्यातील पुनर्परीक्षार्थी ( रिपीटर) विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 53.2 टक्के आहे.


निकालाबाबत आक्षेप असल्यास काय करावं?
ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांच्या अवधित संबंधित विभागाकडे ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल.  त्यासाठी प्रतिविषय 300 रुपये भरावे लागतील.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 


कुठे पाहाल निकाल? 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज म्हणजेच, बुधवारी 08 जून 2022 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी  वाजल्यापासून विद्यार्थ्यांना 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. 


मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का? असा सवालही उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. पण आता जून महिन्यात निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे. अशातच आज बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 


दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार, विद्यार्थी आणि पालकांमध्ये याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच देशातील इतर राज्यांतील दहावी, बारावीचे निकाल मात्र जाहीर करण्यात आले आहेत. अशातच, आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. 


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI