एक्स्प्लोर

बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर मध्यरात्री वाहनं थांबवून लूट

बार्शी-कुर्डुवाडी रोडवर मध्यरात्रीनंतर जाणाऱ्या वाहनांना अडवून सिनेस्टाईल लूटमार करण्यात आली.

सोलापूर : मध्यरात्री रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यात काल (शनिवार) रात्री दरोडेखोरांनी अक्षरशः हैदोस घातला. बार्शी-कुर्डुवाडी रोडवर मध्यरात्रीनंतर जाणाऱ्या वाहनांना अडवून सिनेस्टाईल लूटमार करण्यात आली. हातात शस्त्र घेतलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने वाहने थांबवून प्रचंड दहशत माजवली. एक दोन नाही, तर तब्बल नऊ प्रवासी वाहनं दरोडेखोरांनी लुटली. प्रवाशांच्या अंगावरील दागिन्यांसह मोठ्या प्रमाणात रोकड पळवली. ऐन थंडीत प्रवाशांना दरोडेखोरांनी हैराण केलं आहे. इनोव्हा, स्कॉर्पिओ, अल्टो यांसह खाजही ट्रॅव्हल कंपन्यांच्या दोन बसेसचा समावेश होता. दागिने आणि रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांनी लहान मुलं आणि महिलांना सुद्धा मारहाण केली. तब्बल दोन तास दरोडेखोरांनी प्रवाशांना भीतीच्या वातावरणात ठेवलं. अखेरीस भयभीत झालेले सर्व प्रवासी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंबाजोगाई येथून गोव्याकडे निघालेल्या डॉ. सुधीर धर्मपत्रे यांची इनोव्हा गाडी रिधोरे येथील आरडा पुलाजवळ येताच लुटली. गाडीतील 3 बॅगा दोन चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार त्यांनी कुर्डुवाडी पोलिसात दिली . यानंतर केवळ अर्ध्या तासाच्या फरकात 2 ट्रॅव्हल्स , एक मिनी बस, स्कॉर्पिओ आणि एका अल्टो कारमधील बॅगांची चोरी काही सेकंदात डिकी उघडून करण्यात आली. विशेष म्हणजे या पुलावरील स्पीडब्रेकर वरून जाताना गाड्यांची डिकी उघडून बॅगा चोरल्याची तक्रार देण्यात आली आहे. काही सेकंदात लक्झरीसारख्या मोठ्या बसची डिकी उघडून बॅगा कशा लंपास होऊ शकतात, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. यातील एका अल्टोकारमधील पर्स चोरताना दोघांना पाहण्यात आल्याची तक्रार या अल्टो चालकाने दिली आहे. समोर गाड्या का थांबल्यात हे पाहण्यासाठी ही अल्टो गाडी थांबवली असता पाठीमागे बसणाऱ्या महिलेच्या मांडीवरील पर्स दोन चोरटयांनी लांबविल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं आहे. या 6 गाड्यातील चोरीतून तब्बल 8 लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. मात्र तीनही लक्झरीची डिकी उघडी कशी, याचं उत्तर या गाडी चालकांना देता आलेलं नाही. या प्रकारनंतर पोलिसांनी पहाटेपासूनच या परिसराची झडती मोहीम सुरु केली आहे. यामध्ये पांघरुणं भरलेली एक बॅग आणि काही कागदपत्राशिवाय अजून तरी पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. बार्शी-कुर्डुवाडी हा रास्ता मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. रोज या मार्गावरून जवळपास 300 लक्झरी आणि शेकडो वाहनं प्रवास करतात. पहाटेच्या या चोरी सत्रामुळे पोलीसही खडबडून जागे झाले आहेत. सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांनी या चोऱ्यांच्या तपासासाठी अधिकची पथकं नियुक्त केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Karuna Sharma on Pankaja Munde and Dhananjay Munde: पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका
पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Nagpur Congress Morcha: E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक; नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी
E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक; नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Embed widget