औरंगाबाद : तरुणींची छेड काढणाऱ्या एका रोड रोमियोला 3 तरुणींनी चांगलाच चोप दिला. औरंगाबादच्या वैजापूरमध्ये बसस्थानकावर शनिवारी हा सर्व प्रकार घडला.


औरंगाबादच्या वैजापूरमध्ये या तरुणी  बसस्थानकावर आपल्या बसची वाट पाहात बसल्या होत्या. तेव्हा एका रोड रोमियोनं तरुणींची छेड काढण्यास सुरुवात केली. मुलींच्या आरोपानुसार संबंधित तरुण बराच वेळ मुलींची छेड काढत होता. त्याला मुलींनी आधी समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण जास्तच त्रास देऊ लागल्यानं त्याला चांगलाच चोप दिला.

वैजापूरमध्ये शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान मुलींनी त्याला चोप देऊन सोडून दिलं.