एक्स्प्लोर

ना भाजपशी संबंध, ना दाऊदशी, रियाज भाटींचं स्पष्टीकरण

मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप असलेले रियाज भाटी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. भाजप, दाऊद आणि एकूणच या वादाशी आपला काडीमात्र संबंध नसल्याचं स्पष्टीकरण भाटींनी दिलं आहे. दाऊशी आपला काहीही संबंध नाही. दाऊदचा माणूस असतो, तर आपल्याला संरक्षण कसं मिळालं असतं, असा सवाल रियाज भाटींनी केला आहे. माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही, पण पासपोर्टप्रकरणात खटला सुरु आहे. मात्र माझ्याकडे दोन पासपोर्ट नाहीत, असा दावा भाटींनी केला नवाब मलिकांवर खटला दाखल करणार राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माझ्या चारित्र्यावर संशय व्यक्त केल्याने त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचंही रियाज भाटी यांनी सांगितलं आहे. दोन पासपोर्ट नाहीत माझ्याकडे दोन पासपोर्ट असल्याचा आरोप चुकीचा आहे. बनावट पासपोर्ट प्रकरणामध्ये अडकलो असतो तर इतक्या लवकर सुटलो असतो का, असं विचारत गँगस्टरशी संबंध असणारा मुंबई कसा राहू शकेल, अशी टिपणीही त्यांनी केली. भाजपशी आपला काहीही संबंध नाही, त्याचप्रमाणे माझा भाजपशी कोणताही वाद नाही. मी एमसीएच्या मार्केटिंग कमिटीचा अध्यक्ष आहे. त्यामुळेच आशिष शेलारांशी आपला संबंध येतो, त्याचप्रमाणे शरद पवारांशी भेट होते, असं भाटींनी स्पष्ट केलं आहे.

रियाज भाटी कोण हे पवारांनाच विचारा, भाजपचा राष्ट्रवादीवर पलटवार

दाऊदशी कथित संबंध असणारे रियाज भाटी कोण आहेत हे पवारांना विचारा, असं म्हणत राष्ट्रवादीच्या आरोपांना भाजपनं उत्तर दिलं आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या भाजप कार्यकारिणीचे सदस्य आणि गुंड रियाज भाटी यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी केला होता. रियाज भाटी यांचे थेट दाऊदशी संधान असल्याचा दावाही मलिक यांनी केला होता. पण उलट शरद पवार यांनीच रियाज भाटी यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका महत्त्वाच्या पदावर घेतलं होतं. त्यामुळे रियाज भाटी कोण हे पवारांना विचारा, असा टोला भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी लगावला आहे. रियाज भाटी यांनी आशिष शेलारांना एमसीए निवडणूकीत मतं मिळवून देण्यासाठी विल्सन कॉलेजच्या प्राध्यापकांना धमकावल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. पण भंडारी यांनी त्यांचा संबंध थेट पवारांशी जोडून मलिक यांना जोर का झटका दिला आहे. त्याप्रमाणे भाजपच्या सर्वच नेत्यांशी त्याचे जवळचे संबध आहेत, असा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र रियाज भाटी याचा भाजपशी अथवा भाजपच्या कोणत्याही नेत्याशी कोणताही संबंध नाही, असा दावा भाजपनं केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget