परंपरेप्रमाणे या टँकरमध्ये नीरा नदीतील पाणी आणून नीरास्नान पार पडले. गेल्या 10 वर्षांमध्ये दुसऱ्यांदा भर पावसाळ्यात नीरा नदीला पाणी नाही. त्यामुळे महाराजांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने नीरा स्नान घालण्याची नामुष्की ओढवली आहे.
रिंगणाची मनमोहक दृष्य पाहा
रविवारी सकाळी दहा वाजता पालखी सोहळ्याने अकलूज शहरामध्ये प्रवेश केला. अकलूजमधल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. याच प्रांगणामध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण पार पडले.
आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात बाहेरुन येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढली होती.
तुकोबांच्या पालखीला टॅंकरच्या पाण्याने स्नान, नीरा नदी कोरडी पडल्याने प्रशासनाचा निर्णय | ABP Majha