1. कर्नाटकातील 11 आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेस-जेडीएसचे सरकार धोक्यात, राजीनामा देणारे आमदार मुंबईत दाखल, काँग्रेसचा घोडेबाजाराचा आरोप

2. पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी नव्हे तर 5 रुपयांनी भडकण्याची शक्यता, फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांची माहिती, तर पंतप्रधान मोदींकडून इंधन दरवाढीची पाठराखण

3. नव्या काँग्रेस अध्यक्षांबाबत उत्सुकता कायम, युवा नेत्याला अध्यक्षपद देण्याच्या मागणीला जोर, ज्येष्ठांच्या नावांना विरोध

4. मुसळधार पावसामुळे कोकणातल्या वशिष्ठी, जगबुडी नदीला पूर, जुलै उजाडूनही मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचे डोळे आभाळाकडेच

5. नीरा नदी कोरडी पडल्याने संत तुकोबांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने स्नान, पालखीचे अकलुजच्या दिशेने प्रस्थान, ज्ञानोबांच्या पालखीचे आज पहिले गोल रिंगण

6. मुंबईतील अनधिकृत पार्किंगवर आजपासून दंडात्मक कारवाई, दुचाकीसाठी पाच हजार तर तीन चाकी वाहनांना 8 हजार रुपयांचा दंड

7. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही फ्री पार्किंगला हरताळ, महापालिकेची नोटीस अधिकृत मानायला मॉल्स चालकांचा नकार

8. इंग्लंडमध्ये भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान 'जस्टिस फॉर काश्मीर' बॅनर लावलेल्या हेलिकॉप्टरच्या स्टेडियमभोवती घिरट्या, बीसीसीआयची पाकिस्तानवर बंदी घालण्याची आयसीसीकडे मागणी

9. श्रीलंकेविरोधात भारताचा दमदार विजय, शतक झळकावत रोहित शर्माचा एकाच विश्वचषकात सर्वाधिक 5 शतकं ठोकण्याचा विक्रम, के.एल राहुलचंही शतक

10. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट, नऊ जुलैला भारताचा सामना न्यूझीलंडशी, अकरा जुलैला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांत मुकाबला