भिवंडी : भिवंडी एसटी स्थानकासमोर पुन्हा एकदा रिक्षाचालकाची मुजोरी समोर आली आहे. एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर रिक्षा आडवी लावल्याने झालेल्या वादानंतर रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा आरोप होत आहे.

एसटी स्थानकाच्या गेटवर रिक्षा आडवी लावल्यावरुन रिक्षाचालक शफिक शेख आणि वाहतूक पोलिस रविकांत पाटील यांचा वाद झाला. मात्र शफिक शेखची मुजोरी इतकी वाढली, की त्याने रविकांत पाटील यांच्यावर हात उचलला. या मारहाणीत पाटील जखमी झाले आहेत.

आरोपी शफिक शेखवर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शफिकला अटक करुन न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रिक्षाचालकांची बेदम मारहाण, भिवंडीत एसटी चालकाचा मृत्यू


फेब्रुवारी महिन्यातच भिवंडी एसटी स्थानकाबाहेर रिक्षाचालकांनी केलेल्या बेदम मारहाणीनंतर एसटीचालक प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं.