एक्स्प्लोर

154 PSI नियुक्ती रद्द: हायकोर्टाच्या पर्यायाचा विचार करु: मुख्यमंत्री

नियुक्ती रद्द झाल्याने मॅटने 154 पीएसआयना त्यांच्या मूळ पदावर पाठवलं आहे. त्यामुळे 9 महिन्यांचं प्रशिक्षण घेऊनही या पीएसआयना आता मूळ पदावर जावं लागलं.

औरंगाबाद: नियुक्ती रद्द झालेल्या अनुसूचित जाती जमातीतील 154 पीएसआय प्रकरणी हायकोर्टात जायचं की दुसरा मार्ग काढायचा याबाबत आमचा प्रयत्न सुरु आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. नियुक्ती रद्द झाल्याने मॅटने 154 पीएसआयना त्यांच्या मूळ पदावर पाठवलं आहे. त्यामुळे 9 महिन्यांचं प्रशिक्षण घेऊनही या पीएसआयना आता मूळ पदावर जावं लागलं. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “मॅटचा निर्णय आला आहे. पण राज्य सरकार त्यातून मार्ग काढत आहे. कारण या पीएसआयनी ट्रेनिंग पूर्ण केलं आहे. त्यामुळे मी विधी व न्याय विभागाला सांगितलं आहे. त्यामुळे हायकोर्टात आव्हान द्यायचं की दुसरा मार्ग काढायचा याबाबतचा आमचा प्रयत्न सुरु आहे". काय आहे प्रकरण? पदोन्नतीमधील आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगत मॅटने राज्यातील 154 अनुसूचित जाती जमातीतील फौजदारांची नियुक्ती रोखली आहे. तसंच या सर्वांना त्यांच्या मूळ जागी नियुक्त करावं किंवा नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्याचा आदेशही मॅटने दिला आहे. या निर्णयामुळे प्रशिक्षण पूर्ण करुन नियुक्तीसाठी उत्सुक असलेल्या प्रशिक्षणार्थींमध्ये निराशा पसरली आहे. सरकारने 828 पोलीस उपनिरीक्षक अर्थात फौजदारांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ही भरती करण्यात आली. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी नाशिकमध्ये पाठवण्यात आलं. परंतु ही पदं भरताना पदोन्नतीमधील आरक्षण लागू केल्याचा दावा करत मंदार पाटील, संतोष राठोड, एम.एस. राडीये यांच्यासह सव्वाशे उमेदवारांनी मॅटमध्ये आव्हान दिलं होतं. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप करतानाच, सरकारचा हा निर्णय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणारा असल्याचंही या उमेदवारांचं म्हणणं आहे. त्यांची ही भूमिका मान्य करत मॅटचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एच. जोशी आणि सदस्य प्रविण दीक्षित यांनी सरकारी नोकरीत पदोन्नतीत आरक्षणाचा कायदाच नसताना, दिलेलं आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगत 154 प्रशिक्षणार्थींना पोलिस उपनिरीक्षपदी देण्यात आलेल्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र खात्याअंतर्गत सरळसेवा पद्धतीने निवड होऊनही, आमची निवड पदोन्नतीने झाल्याचं परिपत्रक का काढलं? असा सवाल 154 उमेदवाराचा आहे.त्यामुळे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात तात्काळ पावलं उचलावीत, अशी विनंती या उमेदवारांनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे नियुक्ती रद्द झालेल्या 154 जणांमध्ये प्रशिक्षणामध्ये  दुसरा आलेल्या उमेदवाराचाही समावेश आहे. परीक्षेत पास होऊनही मूळ पदावर का पाठवलं? नाशिकमध्ये नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान महाराष्ट्र पोलीस अकादमीमार्फत घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात नियुक्ती रद्द करुन मूळपदावर पाठवलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होऊनही पुन्हा मूळ पदावर का पाठवलं असा प्रश्न या उमेदवारांचा आहे. मॅटने निकाल देताना सरकारसमोर दोन पर्याय ठेवले होते. पहिला पर्याय 154 जणांना प्रतीक्षेवर ठेवायचं किंवा मूळ पदावर पाठवायचं. मात्र सरकारने टोकाची भूमिका घेत आम्हाला मूळ पदावर पाठवलं. मूळ पदावरच पाठवायचं होतं, मग प्रशिक्षण देऊन परीक्षा का घेतली?या नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणाचा काय उपयोग झाला?  सरकारने प्रशिक्षणादरम्यान एवढा पैसा आणि मनुष्यबळ खर्ची का घातलं? असे प्रश्न या उमेदवारांनी उपस्थित केले आहेत. कोणावरही अन्याय होणार नाही - मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी कोणावरही अन्याय होणार नाही, असा दावा केला.  सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, कोर्टाच्या संदर्भातील काही निर्णय आल्यानंतर असे प्रसंग उद्भवतात, पण मुख्यमंत्र्यांचं याकडे लक्ष आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आज यासंदर्भात चर्चा झाली. येणाऱ्या काळात कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल. असे कायदेशीर प्रसंग येतात, तेव्हा विधी व न्याय विभाग संबंधित कायदेशीर निर्णयाची पडताळणी करते, अभ्यास करते आणि सर्वांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून एक सर्वंकष विचार होत असतो." "यावर तोडगा निघायला किती दिवस लागतील, किती तास लागतील हे सांगता येणार नाही. पण कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल," असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. रामदास आठवले यांची भूमिका दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही 154 पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती रद्द केल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या कायद्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं आठवले म्हणाले. तसंच उपनिरीक्षक पद रद्द करण्यात आलेल्या पोलिसांसोबत मुंबईत माझी बैठक झाली. सरकारने पोलिसांसाठी  निर्णय घ्यावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं. संबंधित बातम्या राज्य सरकारचा ठोस निर्णय नाहीच, 154 पीएसआय मूळ पदावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शपथविधी झालेल्या 154 पीएसआयच्या नियुक्त्यांवर गदा  

154 फौजदारांच्या नियुक्त्या रद्द, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?   

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut and Jaykumar Gore: संजय राऊत जयकुमार गोरेंना फक्त येडXXX म्हणाले, मी तर लिंगपिसाट म्हणतो...'; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घणाघाती टीका
संजय राऊत जयकुमार गोरेंना फक्त येडXXX म्हणाले, मी तर लिंगपिसाट म्हणतो...'; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घणाघाती टीका
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Police Written on Vehical : खासगी वाहनांवर पोलीस लिहणं किंवा पाटी लावणाऱ्यावर कारवाईचे संकेत; वाहतूक विभागाचं राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना पत्र
खासगी वाहनांवर 'पोलीस' लिहणं किंवा पाटी लावणाऱ्यावर कारवाईचे संकेत; वाहतूक विभागाचं राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना पत्र
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Embed widget