एक्स्प्लोर

सिंधुदुर्गमधील चारही नगरपंचायतीचे निकाल स्पष्ट, कुडाळमध्ये राणे सत्ता स्थापन करणार का? पाहा कोणाला किती जागा?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ते पाहुयात...

Nagar Panchayat Elections 2022 Result : राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणाहून अत्यंत धक्कादायक निकाल हाती आले आहेत. आत्तापर्यंत सर्वात जास्त जागा या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. कुडाळमध्ये काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत आहे.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कुडाळ, दोडामार्ग आणि देवगड या चारही नगरपंचायतीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. या चारही नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. भाजपने मात्र चारी नगरपंचायतमध्ये आपली सत्ता आणू असे म्हटले आहे. तर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली असा टोला मारला आहे. दोडामार्गमध्ये आमदार दीपक केसरकर याना मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपने त्याठिकाणी एकहाती सत्ता आणली आहे. तर कुडाळमध्ये काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काँगेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ असं म्हटले आहे. 

कुडाळच्या मतदारांनी नारायण राणेंना व त्यांच्या मुलांना या निवडणुकीतून जागा दाखवली आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. कॉंग्रेस जरी स्वतंत्र निवडणूक लढली असली तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करून कुडाळ नगरपंचायतीत महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बसवणार अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

कॉंग्रेसचा मान सन्मान ठेवून एक नंबरचे पद जो पक्ष देईल, त्यांच्यासोबत युती करणार असल्याचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची म्हटले आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यावेळी महाविकास आघाडीच्या दोन्ही पक्षांनी कॉंग्रेसची गळचेपी केली. मात्र, त्यातून कॉंग्रेस बाहेर पडली. त्यामुळे त्यांना गरज असली तरचं महाविकास आघाडीसोबत जाणार नाही. तर एक दिवस या दोन्ही पक्षाची गळचेपी कॉंग्रेस पक्ष करणार असल्याचे म्हणत बाळा गावडे यांनी  शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला इशारा दिला आहे.

कुडाळ नगरपंचायतीत कॉंग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकमेकांविरोधात लढून सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात. तर स्थानिक पातळीवर कॉंग्रेसला सोबत घेऊन कुडाळ नगरपंचायतीत भाजप सत्ता स्थापन करू शकते. भाजपचे वरीष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील. कुडाळ नगरपंचायतीप्रमाणे देवगडमध्येही त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. चारही ठिकाणी भाजपची सत्ता येईल. काही ठिकाणी आम्हाला समविचारी पक्षांशी किंवा अन्य पक्षांचे सहकार्य घ्यावं लागेल. वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला की चारही नगरपंचायतीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष बसतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि गटनेते रणजीत देसाई यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायतीत कोणत्या पक्षाला किती जागा 

कुडाळ नगरपंचायतीत भाजप 8 तर सेना 7

शिवसेना - 7
भाजप - 8
काँग्रेस- 2
राष्ट्रवादी - ०
अपक्ष - ०
इतर - ०

देवगड जामसंडे नगरपंचायतीत सेना भाजप समसमान

शिवसेना - 8
भाजप - 8
काँग्रेस- ०
राष्ट्रवादी - 1
अपक्ष - ०
इतर - ०

कसई दोडामार्ग नगरपंचायतीत  भाजपचे वर्चस्व

भाजप - 12
शिवसेना - 2
अपक्ष - 2
राष्ट्रवादी - 1
काँग्रेस - ०
 इतर - ०

वैभववाडी नगरपंचायतीत  भाजपला 9 जागा

भाजप - 9
शिवसेना - 5
अपक्ष - 3
काँग्रेस - ०
राष्ट्रवादी - ०

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget