एक्स्प्लोर

आमदारानं आरक्षणाला विरोध करणं ही भुमिका न समजणारी : सरकारी वकील

जलिल यांची भुमिका न समजणारी आहे, असा दावा सरकारी वकिलांनी आज (गुरुवारी) हायकोर्टात केला. विधीमंडळात निर्णय झाला तेव्हा न बोलता नंतर कोर्टात आव्हान द्यायचं हे कळण्यापलीकडचं आहे, असंही सरकारी पक्षानं म्हटलं.

मुंबई : आमदार असूनही विधिमंडळात पास झालेल्या मराठा आरक्षणाला विरोध करणं, ही जलिल यांची भुमिका न समजणारी आहे, असा दावा सरकारी वकिलांनी आज (गुरुवारी) हायकोर्टात केला. विधीमंडळात निर्णय झाला तेव्हा न बोलता नंतर कोर्टात आव्हान द्यायचं हे कळण्यापलीकडचं आहे, असंही सरकारी पक्षानं म्हटलं. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी मराठा आरक्षणा विरोधात याचिका दाखल केली होती. आज कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली. कोर्टाने याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे आणि महाधिवक्त्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आज झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने इम्तियाज जलिल यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. इम्तियाज जलिल यांची मागणी मराठा आरक्षणाला विरोध करत राज्य सरकारनं दिलेल्या मराठा समाजाच्या 16% आरक्षणाला त्वरित स्थगिती द्या. राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा याबाबतच्या अहवालाला आव्हान देत मराठा आरक्षण रद्द करा, अशी विनंती करणारी याचिका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. राज्यातील मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना तो डावलला जात असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. मुस्लिम समाजाचं आणि यांतील काही ठराविक घटकांचं जातीनिहाय सर्वेक्षण करावा.तसेच  सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम वर्गाला तात्काळ आरक्षण मंजूर करावं, असंही या याचिकेत म्हटलेलं आहे. प्रकरण न्यायमूर्ती  मोरे रणजित आणि भारती डांगरे यांच्याकडे वर्ग मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिका आता न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. याआधी ही सुनावणी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुरू होती. पुढील सुनावणी 23 जानेवारीला अॅड. सतिश तळेकर यांच्यामार्फत मराठा आरक्षणाविरोधात नुकतीच  हायकोर्टात याचिका सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य याचिकेसोबत 23 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे. इम्तियाज जलील हे एमआयएम पक्षाचे नेते असून औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Climate Week India 2026: हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Devendra Fadnavis on Maharashtra Drought: मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, निकषांत न बसणाऱ्या तालुक्यांनाही मिळणार मदत; देवेंद्र फडणवीस म्हणाले..
मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, निकषांत न बसणाऱ्या तालुक्यांनाही मिळणार मदत; देवेंद्र फडणवीस म्हणाले..
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
Siya Goyal Pune Crime: सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत गेली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत गेली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
Embed widget