मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यातील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील विविध जिल्ह्यात असलेल्या 14 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय यांचे नामांतर करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यानुसार, या महाविद्यालयांना महापुरुषांचे व संबंधित जिल्ह्यात योगदान दिलेल्या व्यक्तींचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने 14 आयटीआय यांचे नामांतर करुन 14 महान व्यक्तींची नावेदेखील या आयटीआय संस्थेसाठी देऊ केली आहेत. त्यामध्ये, ठाणे जिल्ह्यातील आयटीआयला (ITI) धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले आहे. तर, बीडमधील (Beed) आयटीआयला दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं नाव देण्यात आलं आहे. 

 

राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडलळाच्या बैठकीत घेण्यात आला असून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे. या आयटीआय कॉलेजेसला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हा असलेल्या ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आलं आहे. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील आयटीआयला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्यात आले आहे. कोल्हापूरच्या आयटीआयला राजर्षि शाहू महाराजांचे तर बीडच्या आयटीआयला विनायक मेटेंचे नाव देण्यात आलं आहे. 

 

नेमकं कुठल्या आयटीआयला कुणाचं नाव? 


 

सध्याचे नाव  -                            नव्याने करावयाचे नामकरण

 

01. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे - धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था

02. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था 

03. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था 

04. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड - कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था 

05. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर. - भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था 

06. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि.नाशिक - पालघर महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था 

07. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था

08. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती - संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती

09. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली - लोकशाहीर आण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था

10. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव - कवयत्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव

11. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा - दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा.

12. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.- दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.

13. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई. - महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई

14. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव - आचार्य विदयासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव.

हेही वाचा


बाप रे... मुंबईच्या 'लोकल'मध्ये आढळली बेवारस बॅग; बॅगमध्ये 20 लाख कॅश, प्रवाशाचा शोध सुरू