जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना रुग्णांवर उपचारासाठी उपयोग करण्यात येत असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. अनेक रुग्णाचे नातेवाईक आता कोणी रेमडेसिवीर देतं का? म्हणून दारोदार भटकत असल्याचे पाहायला मिळत आहे.


जळगाव जिल्ह्यात गेल्या महिना भरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. एकाच वेळेस मोठ्या संख्येने हजारो रुग्ण वाढल्याने त्याचा परिणाम हा सर्वच ठिकाणी होताना दिसून येत आहे. अशाच प्रकारे कोरोनाच्या उपचारात महत्वपूर्ण असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक हे सध्या रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी दारोदार भटकत आहेत. मात्र, त्यांना रेमडेसिवीर मिळत नसल्याने आपल्या रुग्णाचं काय होणार या विषयावर अनेकांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे.


या विषयावर जिल्हाधीऱ्यांशी बोलणं केलं असता त्यांनी म्हटल आहे की सध्या रुग्णांना गरज लागेल एवढा इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून शासनाने मान्यता दिलेल्या रुग्णालयात उपलब्ध आहेत. दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काही प्रमाणात तुटवडा असल्याचं जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्य केलं आहे. मात्र, काही खासगी डॉक्टर रुग्णांना अनावश्यकरित्या ही इंजेक्शन लिहून देत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना फिरावे लागत आहे. रुग्णाचा स्कोर दहाच्या पुढे असल्यास या इंजेक्शनचा वापर करावा असे निर्देश असतानाही अनेक खासगी डॉक्टर मागणी करीत असल्याने मागणी वाढली आहे. येत्या चार दिवसात जिल्ह्याला आवश्यक असलेली रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.


..म्हणून रेमडिसीवीर औषधाचा तुटवडा
कोरोना व्हायरसचं बळावणारं संकट पाहता, राज्यात रेमडिसवीर औषधांचा तुटवडा झाला आहे, अशा तक्रारी मागील काही दिवसांपासून येत आहेत. टंचाई निर्माण झाल्याने दिसून येत असेल तरी त्याची एफडीए कडून मिळालेल्या माहितीनुसार काही कारणंही आहेत.


पहिल्या लाटेच्या वेळी रेमडिसवीर 15 ते 20 टक्के रूग्णांना दिले जात होते. आज हे प्रमाण खाजगी रुग्णालयातून 80 टक्के पर्यंत पोहचले आहे. हे स्टँडर्ड प्रोटोकॅलमध्ये बसत नाही. हे औषध व्होअर द काऊंटर विक्रीला उपलब्ध होत नाहीत. जिथे फार्मसी आहे तिथे मात्र रूग्णाला ते दिले गेले आहे.


ही औषधं फक्त प्रिस्क्रिप्शन वरच मिळतात. म्हणून ती बाहेर उपलब्ध करुन दिलेली नाहीत. एका महिनाभरापुर्वी एफडीएने या औषधाच्या किंमती कमी करण्याची मोहीम सुरू केली. एका कंपनीकडून किंमत कमीही करण्यात आली. ती किंमत साडे आठशे रुपये झाली असली तरी आताही एमआरपी नुसार रेमडीसवीरची विक्री साडे चार ते पाच हजारांना होते आहे.


एका रूग्णालय पाच चे सात डोस दिले की रूग्णांच्या बिलातही वाढ होत आहे. सध्या तरी प्रत्येक रूग्णाला हे इंजेक्शन देण्याची खरच गरज आहे काय हे तपासून पाहणारा आरोग्य विभागाची यंत्रणा नाही. डॅक्टर स्वःतच ठरवून देत आहेत. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे.