एक्स्प्लोर

उद्यापासून मालेगाव ब्लास्ट खटल्याची नियमित सुनावणी सुरू

अनलॉकनंतर राज्यभरातील सर्व कनिष्ठ कोर्टांचं नियमित कामकाज आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे या प्रलंबित खटल्यातील सुनावणींचा वेग वाढवण्याचा निर्णय विशेष एनआयए कोर्टानं घेतला आहे.

मुंबई : साल 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याची नियमित सुनावणी 3 डिसेंबरपासून सुरू होत असल्यानं या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यासह इतर सर्व आरोपींना कोर्टात हजेरी लावण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं जारी केले आहेत. अनलॉकनंतर राज्यभरातील सर्व कनिष्ठ कोर्टांचं नियमित कामकाज आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे या प्रलंबित खटल्यातील सुनावणींचा वेग वाढवण्याचा निर्णय विशेष एनआयए कोर्टानं घेतला आहे.

वास्तविक गेल्यावर्षी एनआयएनं मुंबई उच्च न्यायालयात आश्वासन दिलं होतं की, डिसेंबर 2020 पर्यंत हा खटला निकाली काढला जाईल. मात्र लॉकडाऊनपूर्वीच्या सहा महिन्यांत या खटल्यातील केवळ 14 जणांचीच साक्ष नोंदवण्यात आली आहे. या खटल्यात एकूण 475 साक्षीदार आहेत ज्यातील 300 हून अधिक साक्षीदारांची साक्ष अद्याप बाकी आहे. मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊनमुळे यात काहीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे महिन्याभरात ही सुनावणी कशी पूर्ण होणार हा सवालच आहे.

गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याची सुनावणी जलदगतीनं घेण्याचे निर्देश हायकोर्टानं याआधीच एनआयए कोर्टाला दिलेले आहेत. मात्र अनेकदा या खटल्याच्या सुनावणीला काही वकील हजरच राहत नाहीत. या खटल्याला जाणून बुजून विलंब केला जातोय, असा आरोप या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांच्यावतीनं वारंवार करण्यात आला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला एनआयए कोर्टाने लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी करत सध्या जामीनावर असलेले आरोपी समीर कुलकर्णी यांनी हायकोर्टात केला होती.

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे एका मशिदीत बॉम्बस्फोट झाले होते. यात 7 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदिप डांगे यांना अटक करून त्यांच्यावर एनआयए विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील काही संशयित आरोप अद्याप फरार असून वरील सर्व आरोपी जामीनवर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
NEET Results: 'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
Sonam Wangchuk: गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ
गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंवर शाईफेक, आंदोलनस्थळी गोंधळ 
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंवर शाईफेक, आंदोलनस्थळी गोंधळ 

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
Abhijeet Dipke: आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
Video: आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
NEET Results: 'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
Embed widget