एक्स्प्लोर

माझा इफेक्ट : पंकजा मुंडेंच्या पतीच्या कंपनीने मद्यार्क निर्मिती थांबवली

लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कंपनीने आपलं उत्पादन थांबवले आहे. त्यामुळे कुंभेफळ गावातील गावकऱ्यांची दूषित पाण्याच्या त्रासापासून सुटका होण्याची चिन्ह दिसत आहेत.

औरंगाबाद : एबीपी माझाच्या बातमीनंतर ग्रामविकास मंत्री पंकाजा मुंडे यांच्या पतीचा कारखाना असलेल्या रेडिको कंपनीने आपले उत्पादन थांबवले आहे. दोन दिवसांपूर्वी एबीपी माझाने रेडिको कंपनी दूषित पाणी नाल्यात सोडत असल्यामुळे कुंभेफळ गावातील लोक आजारी असल्याचं दाखवले होते. कुभफेळ हे गाव गेल्या पाच वर्षांपासून या दूषित पाण्याच्या विरोधात प्रदूषण महामंडळाकडे तक्रार करत होते. मात्र त्यांना प्रदूषण महामंडळ काही मदत करत नव्हते. माझाने कुभेंफळच्या गावकऱ्यांची व्यथा दाखवल्यानंतर प्रदूषण महामंडळाला जाग आली. त्यांनी पाण्याचे नमुने घेतले आहेत. शिवाय कंपनीला नोटीसही पाठवणार असल्याची माहिती  प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कंपनीने आपलं उत्पादन थांबवले आहे. त्यामुळे कुंभेफळ गावातील गावकऱ्यांची दूषित पाण्याच्या त्रासापासून सुटका होण्याची चिन्ह दिसत आहेत. काय आहे प्रकरण? गावागावात स्वच्छता अभियान राबवण्याचा सल्ला देणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवेंच्या कंपनीनेच या अभियानाला हरताळ फासला आहे. पालवेंच्या रेडिको कंपनीतून केमिकलयुक्त दूषित पाणी सोडलं जात असल्याची तक्रार होती. औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये अमित पालवेंचा रेडिको मद्यार्क निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यातून कुंभेफळ गावात केमिकलयुक्त दुषित पाणी सोडलं जातं. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी आणि आजार पसरत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. इतकंच नाही तर गावातल्या विहिरी, बोअरवेल्स आणि हातपंपातूनही लाल पाणी येतं. परिणामी इथली शेती नापीक झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे रेडिको मद्यार्क कंपनीतून निघणारं हे पाणी सुकना धरणात जातं. तिथून 10 ते 15 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. नागरिकांनी प्रदूषण महामंडळाकडे तक्रारी केल्या. पण पंकजा मुंडेंच्या पतीचा कारखाना असल्यानं कारवाई होत नसल्याचं ग्रामस्थांच म्हणणं आहे. रेडिको कंपनीनं मात्र ग्रामस्थांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते पावसाचं पाणी असल्याचं सांगून हात वर केले आहेत. रेडिको कंपनी सुरुवातीपासूनच वादात अडकली आहे. 2015 मध्ये शेतात केमिकल टाकल्याचा आरोप कंपनीवर झाला. त्यामुळे पिकांची नासाडीही झाली. आता पुन्हा एकदा दुषित पाण्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. गावा-गावात स्वच्छतेचं अभियान राबविणाऱ्या पंकजा मुंडेंनी या कारखान्याकडे लक्ष द्यावं, इतकीच मागणी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Embed widget