एक्स्प्लोर

रिॲलिटी चेक : सेतू कार्यालयात खरंच मराठा जातीचा दाखला मिळतो?

अनेक जण हा दाखला वाचून सेतू कार्यालयांवर धडका मारत आहेत. त्यामुळे या मेसेजच्या आधारावर एबीपी माझा जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी गेलं आणि वास्तव समोर आलं.

बीड : मराठा जातीचा दाखला खरंच मिळणार? जातीच्या पुराव्यांद्वारे दाखला मिळणार? सेतू कार्यालयात खरंच दाखला मिळतो? मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. मराठा दाखल मिळवण्यासाठी काय काय करायचं? याची जंत्रीच त्यात दिली आहे. शाळेचा दाखला घ्या, बोनाफाईड सर्टिफिकेट घ्या, घरातल्या व्यक्तींचा दाखला मिळवा, रहिवासी प्रमाणपत्र काढा, लाईट बिल, ड्रायव्हिंग लायसन्स... हे जमवा आणि ते जमवा... पण हा सगळा खटाटोप करुन खरंच असा मराठा असल्याचा दाखला मिळतोय का? अनेक जण हा दाखला वाचून सेतू कार्यालयांवर धडका मारत आहेत. त्यामुळे या मेसेजच्या आधारावर एबीपी माझा जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी गेलं आणि वास्तव समोर आलं. आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी अनेक मुलं सेतू केंद्रावर विचारणा करत आहेत, मात्र सेतू केंद्रावर याची कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याने मुलांना प्रमाणपत्र मिळत नाही. तर 2014 मध्ये सरकारच्या पोर्टलवर मराठा आरक्षणासाठीचा जो फोरमॅट होता, तो अजूनही बदललेला नाही. त्यामुळे सेतू सुविधा केंद्र चालक आरक्षणाच्या प्रमाणपत्रासाठी लागणारी माहिती भरु शकत नाहीत. सरकाराने मेगाभरतीची घोषणा केल्यानंतर अनेक मुलं आरक्षणाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी घाई करत आहेत. मात्र त्याची माहिती कुठच उपलब्ध होत नाही. तशा माहितीचं परिपत्रक सेतू केंद्र किवा तहसील कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. प्रमाणपत्रासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स मुलांकडे आहेत, मात्र माहिती कुठे भरायची हे अजून समजलेलं नाही. 2014 मध्ये  मिळालेल्या आरक्षणाचा फायदा मराठा समाजतील काही मुलांना झाला. मात्र त्यावेळीही बहुसंख्य मुलांकडे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना याचा फायदा घेता आला नाही. तर आता आरक्षण मिळूनही त्यावर त्वरित अंमलबजावणी होत नसल्याने अनेक मुलं निराश झाली आहेत. नुकतीच मेगाभरती होणार असल्याची घोषणा झाली असताना, मराठा समाजातील मुलांना आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या जातीचा प्रमाणपत्र मात्र अद्याप उपलब्ध नाहीत. सरकार स्तरावर मिळणाऱ्या या आदेशाची सध्या ही कार्यालयं वाट पाहत आहेत. त्यामुळे आता आरक्षण जाहीर झालं खरं मात्र ते जातीचं प्रमाणपत्र या विद्यार्थ्यांना कधी मिळणार हा प्रश्नच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणी प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणी प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Nagpur BJP: बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी चढाओढ; कुठे थेट लढत, कुठे बंडखोरी, किती आले उमेदवारी अर्ज अन् किती ठरले वैध, जाणून घ्या सविस्तर
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी चढाओढ; कुठे थेट लढत, कुठे बंडखोरी, किती आले उमेदवारी अर्ज अन् किती ठरले वैध, जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Embed widget