Ravindra Mahajani Death : ज्येष्ठ सिनेअभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचा मृत्यू झाला आहे. 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या (Death) राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. किमान दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या जाण्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. महाजनी यांनी सफाई कर्मचारी महिलेशी शेवटचा संवाद साधला होता. मंगळवारनंतर महाजनी यांनी फ्लॅटचे दारचं उघडले नाही, असं सफाई कर्मचारी आदीका वारींगे यांनी सांगितलं. तर शुक्रवारी दिवसभराचा घटनाक्रम शेजाऱ्यांनी सांगितला आहे.



महाजनींच्या राहत्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांना दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्यांनी आजूबाजुच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर महाजनींच्या घरातून दुर्गंधी येत होती. त्यानंतर सिक्युरिटीला यासंदर्भात माहिती देण्यात आली आणि नंतर पोलिसांनादेखील यासंदर्भात माहिती देण्यात आली. ते अभिनेते आहेत याची कल्पना शेजराच्यांना होती. मात्र एवढे मोठे अभिनेते आहेत हे शेजारच्यांना त्यांच्या मृत्यूनंतर समजलं. 


कचरा नेणाऱ्या महिलेनं दार ठोठावलं पण...


मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्या घरातला कचरा नेण्यासाठी महिला येत होती. त्याच महिलेनं एबीपी माझाशी संवाद साधला. दोन दिवसांपासून महाजनी यांनी दार उघडलं नव्हतं. कचरा नेणाऱ्या महिलेने सलग दोन दिवस दार ठोठावत होत्या, मात्र त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर काल त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या मृतदेह आता पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या पायाला किरकोळ जखमा असल्याचं सांगण्यात आहे. त्यांचा मृत्यू नेमका कधी आणि कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतर समोर येईल. 


2-3 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला; पोलिसांचा अंदाज


या सगळ्याची माहिती मिळाल्यानंतर रविंद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर महाजनी पुण्याहून तळेगाव दाभाडे पोहचला आहे. गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून ते एकटेच इथं राहत होते. भाड्याने हा फ्लॅट त्यांनी घेतला होता. मात्र शुक्रवारी सायंकाळी अचानकपणे त्याच्या घरातून दुर्गंधीचा वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. पोलिसांनी घराचे दार तोडून प्रवेश केला तेंव्हा ते मृतावस्थेत आढळले. सर्व परिस्थिती पाहिली असता 2-3 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड; पुण्यातील घरात आढळला मृतदेह