Deputy CM Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री नवनिर्वाचित अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज नाशिकमध्ये (Nashik Visit) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज नाशिकमध्ये येणार आहेत. दरम्यान, नाशिकपर्यंतचा प्रवास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदे भारत ट्रेननं केला.  अजितदादांचं मोठ्या जल्लोषात नाशिकमध्ये स्वागत करण्यात आलं. गेल्या आठवड्यात शरद पवारांनी येवल्यातील सभेला जाताना नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन केलं होतं. त्याला आजच्या शक्तिप्रदर्शनातून अजित पवार उत्तर देणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, कालच अजित पवार अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळे अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 


सकाळी लवकर उठून आपले दौरे करणारे दादा नाशिकसाठीही पहाटेच रवाना झाले. सकाळी सहा वाजता ठाणे रेल्वे स्थानकाहून अजित पवारांनी वंदे भारत ट्रेननं नाशिककडे प्रवास सुरू केला. या प्रवासात एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसले आणि अजित दादा आणि त्यांच्या गप्पाच रंगल्या. अजित दादांना पाहुन ते ज्येष्ठ नागरिक भारावून गेले. "दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणं-देणं नाही. अजितदादा म्हणजे, कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर... अशीच जनतेची कामं करा, बेस्ट लक दादा", भारवलेल्या स्वरातच त्या प्रवाशानं अजित पवारांना शुभेच्छा दिल्या. आज वंदे भारत ट्रेनमध्ये अशाच अनेकांच्या भावना होत्या. अजित दादांनी अनेकांशी संवाद साधल्या. 


आज शनिवारी नाशिक येथे आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वंदे भारत ट्रेननं सकाळी नाशिककडे रवाना झाले. नेहमी प्रमाणे वृत्तपत्रं वाचत अजित पवार यांचा प्रवास सुरू झाला. मात्र या प्रवासात सहप्रवासी असलेले एक  ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी येऊन बसले. "दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणं-देणं नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर... अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक दादा", अशा शब्दात त्यांनी जणू राज्यातल्या जानेतेचीच प्रतिनिधीक भावना व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा जे शक्य आहे, लोक हिताचे आहे ते करत राहणार, काही सूचना असतील तर करा, असं सांगत आपल्यासोबत असणाऱ्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना त्यांची नोंद घेण्यास सांगितलं. प्रवासात इतर प्रवाशांना त्रास होऊ नये, कोणाला अडवू नका अशा सूचना  आपल्या सुरक्षा राक्षकांना केल्या. अशा प्रकारे वंदे भारत ट्रेनने अजितदादांची क्रेझ अनुभवली.


एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आजचा नाशिक दौरा 



  • 11.10 वाजता : मुंबईहुन विमानाने ओझर विमानतळ

  • 11.30 वाजता : शासन आपल्या दारी कार्यक्रम, डोंगरे वसतीगृह मैदान, गंगापूर रोड

  • 1.30 वाजता : मुलींसाठी सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र उदघाटन, त्र्यंबकेश्वर रोड 

  • 2.30 वाजता : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यशाळेस उपस्थिती, गेट वे हॉटेल, पाथर्डी फाटा परिसर

  • 3.45 वाजता : ओझरहुन विमानानं मुंबईकडे रवाना होणार 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


खातेवाटप जाहीर होताच अजितदादा सिल्वर ओकवर; शपथविधीनंतर पहिल्यांदाच अजित पवार थोरल्या पवारांच्या निवासस्थानी