एक्स्प्लोर
लग्नात कार्यकर्त्याचा हट्ट, रविकांत तुपकरांचा झिंगाट डान्स
कार्यकर्त्याच्या लग्नात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा मनमोकळा अंदाज पाहायला मिळाला.
बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या झिंगाट नृत्याने एकच धमाल उडवून दिली आहे. कार्यकर्त्याच्या लग्नात तुपकरांचा मनमोकळा अंदाज पाहायला मिळाला.
रवीकांत तुपकर यांचे खंदे समर्थक संदीप सावळे यांचं लग्न होतं. बुलडाणा जिल्ह्याच्या डोंगर शेवली भागात राहणाऱ्या सावळेंचा विवाह औरंगाबाद जिल्ह्याच्या आनवीमध्ये पार पडला.
'रवी भाऊ आल्याशिवाय बोहल्यावर चढणार नाही' असा हट्ट सावळेंनी धरला होता. आपल्या कार्यकर्त्याचा आग्रह न मोडता तुपकरांनी लग्नाला हजेरी तर लावलीच, पण कुठलंही व्हीआयपी कल्चर न बाळगता या युवा नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर ठेका धरला.
रविकांत तुपकर यांनी वऱ्हांडीसोबत मनसोक्त डान्स केला. त्यानंतरच नवरदेव बोहल्यावर चढला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement