एक्स्प्लोर

Ravikant Tupkar : आंदोलन हिंसक झाल्याप्रकरणी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक

Ravikant Tupkar :रविकांत तुपकर, त्यांच्या पत्नी आणि इतर पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आज त्यांना न्यायलयात हजर करण्यात येणार आहे.

कापूस आणि सोयाबीन आंदोलन हिंसक झाल्याप्रकरणी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये 21 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी दुपारी बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर आणि इतर पाच जणांना अटक केली. या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तुपकर यांच्यावर अनेक गुन्हे अजामीनपात्र असल्याने जामीन न मिळाल्यास  कारागृहात जाणे लागण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात तुपकर यांनी आंदोलन पुकारलं होतं. याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसाठी रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकर यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. प्रशासनाकडून कोणत्याही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर हे आंदोलन आणखी चिघळलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली होती. पोलिसांच्या गाडीच्या काचाही यावेळी फोडण्यात आल्या. यानंतर तुपकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला होता. 17 नोव्हेंबर बुधवारपासून सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला शुक्रवारी संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्तारोको करण्यात आला होता. दरम्यान प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नसल्यानं कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले होते. आंदोलनस्थळी तुपकरांच्या निवासस्थानाबाहेर एका संतप्त कार्यकर्त्यानं आपल्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि एकच गदारोळ उडाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आणि मलकापूर औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्तारोको करत जोरदार घोषणाबाजी झाली. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांच्या गाडीच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या. तारांबळ उडालेल्या प्रशासनानं सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, शेवटी काही कालावधीनंतर प्रकरण निवळलं.  

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं

Embed widget