एक्स्प्लोर

रत्नाकर गुट्टे महाराष्ट्राचे नीरव मोदी : धनंजय मुंडे

रत्नाकर गुट्टेंनी कोट्यवधी रुपये बुडवले. गुट्टेंनी शेतकऱ्यांची फसवणूक करुन शेकडो शेल कंपन्यांची स्थापना केली.

नागपूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावे 5 हजार 500 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे छोटे नीरव मोदी असल्याचंही ते म्हणाले. "रत्नाकर गुट्टेंनी कोट्यवधी रुपये बुडवले. गुट्टेंनी शेतकऱ्यांची फसवणूक करुन शेकडो शेल कंपन्यांची स्थापना केली. 23 बनावट कंपन्या तयार करुन शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतलं आणि हे प्रकरण दाबण्यासाठी शेतकऱ्यांना धमकावलं, तसंच दमदाटीही केली," असा दावा धनंजय मुंडे यांनी केला. "रत्नाकर गुट्टेने नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावे हे कर्ज उचललं, त्यात एका शेतकऱ्याच्या नावे 40 ते 50 लाख उचललं. इतकंच नाही तर न्यायमूर्तींच्या मयत भावाच्या नावानेही बनावट कर्ज घेतलं. देशातील एकाही बँकेला त्यांनी सोडलं नाही," असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. "एकीकडे डीएसके यांच्यावर कारवाई होऊन अटक झाली. गुंतवणूकदारांनी सहमतीने पैसे गुंतवले, तिथे पोलिस लगेच कारवाई करतात. मात्र इथे 25,000 शेतकरी आहेत. इथे मात्र गुन्हा नोंदवूनही सुद्धा कारवाई केली जात नाही. रत्नाकर गुट्टे मोकाट का?" असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. कोण आहेत रत्नाकर गुट्टे? रत्नाकर गुट्टे परळी तालुक्यातल्या दैठणाघाटचे रहिवाशी. परळीच्या थर्मल प्लाँटवर मजूर म्हणून काम करत होते. थर्मल स्टेशनमधली छोटी मोठी कामं घ्यायला सुरुवात केली. तिथून पुढे गुट्टे मोठे कंत्राटदार झाले. सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या माध्यमातून गुट्टेंनी देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामं केली आहेत. रत्नाकर गुट्टे हे अजित पवारांचे निकटवर्तीय होते. गंगाखेड शुगर या कारखान्याचा शुभारंभही शरद पवार यांनी केला होता. रत्नाकर गुट्टेंच्या पत्नी सुधामती गुट्टे या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस होत्या. सध्या रत्नाकर गुट्टे पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जात असले तरी गुट्टे सध्या महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षात आहेत. मागची विधानसभा गुट्टेनी जानकरांच्या पक्षातर्फे लढली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणारAmol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?MVA Government : मविआ काळात फडणवीस, शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास SIT मार्फत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
Astrology : यंदाची संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Embed widget