एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र तयार करणारी टोळी गजाआड

रत्नागिरीच्या फिनोलेक्स अकॅडमीमध्ये द्वितीय वर्षासाठी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या गुणपत्रकेबाबत फिनोलेक्स अकॅडमीच्या व्यवस्थापनाला संशय आला आणि त्यांनी या विद्यार्थ्याचे गुणपत्रक पडताळणीसाठी विद्यापीठाकडे पाठवले.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केलाय. विशेष म्हणजे या टोळीत मुंबई विद्यापीठाचेच कर्मचारी पोलिसांच्या हाती लागले आहेत. रत्नागिरीच्या फिनोलेक्स अकॅडमीमध्ये द्वितीय वर्षासाठी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या गुणपत्रकेबाबत फिनोलेक्स अकॅडमीच्या व्यवस्थापनाला संशय आला आणि त्यांनी या विद्यार्थ्याचे गुणपत्रक पडताळणीसाठी विद्यापीठाकडे पाठवले. मुंबई विद्यापीठाकडून धक्कादायक उत्तर आले. या विद्यार्थ्याने तयार केलेले मुंबई विद्यापीठाचे हे गुणपत्रक हुबेहूब असलं तरी बनावट असल्याचे समोर आलं. फिनोलेक्स अकॅडमीने याबाबतची तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात नोंदवली आणि यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं खोदायला सुरवात केली. बनावट गुणपत्रक महाविद्यालयाला देणाऱ्या या विद्यार्थ्यापासून सुरु झालेले प्रकरण प्रथम महाविद्यालयाच्या गेटवर काम करणाऱ्या खासगी सुरक्षारक्षकापासून थेट मुंबई विद्यापीठाच्या मुंबई  कार्यालयात पोहोचलं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, हे बनावट गुणपत्रक मुंबई विद्यापीठाच्या मुंबई येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयार केल्याचे समोर आलं. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मग या प्रकरणात मुंबई विद्यापीठातीलच डेटा एन्ट्री ऑपरेटर गोरखनाथ गायकवाडसह एक शिपाई प्रवीण वारीक, डाटा इन्ट्री ऑपरेटर महेश बागवे आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील क्लार्क गणेश गंगाराम मुणगेकर यांच्या मुसक्या आवळल्या. एक लाख 35 हजार रुपयांच्या बदल्यात मुंबई विद्यापीठातील या मंडळींनी विद्यार्थ्याला गणित आणि बेसिक इलेक्ट्रिकल्स या दोन विषयात उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक दिल्याचे उघड झाले. या विद्यार्थ्याने महाविद्यालयाला फसवण्याचा प्रयत्न केला, हे या प्रकरणामुळे उघड झालेच. मात्र, त्याचसोबत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सखोल तपासाने मुंबई विद्यापीठातील बनावट गुणपत्रक तयार करणाऱ्या टोळीचीही भांडाफोड झाली.

महत्त्वाच्या बातम्या

धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, लाडकी बहीण योजनेमुळं सरकारची कसरत, मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली
धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, लाडकी बहीण योजनेमुळं सरकारची कसरत, मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली
Mumbai : गोवंडीत 14 फुटांवरील झोपड्यांना BMC च्या नोटिसा, 24 तासांत बांधकाम हटवण्याचे आदेश 
Mumbai : गोवंडीत 14 फुटांवरील झोपड्यांना BMC च्या नोटिसा, 24 तासांत बांधकाम हटवण्याचे आदेश 
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget