रत्नागिरी : हरियाणातल्या बाबा राम रहीमनंतर आता रत्नागिरीतला एक बाबा वादात आला आहे. पूर्वी रत्नागिरी पोलिस खात्यात नोकरीला असलेला हा बाबा स्वतःला आधुनिक युगातील स्वामी समर्थांचा अवतार मानतो.
श्रीकृष्ण पाटील असं या बाबाचं नाव आहे. त्याच्या लीला रोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रत्नागिरीतील झरेवाडीमध्ये या बाबाचा मठ आहे, तर दर गुरुवारी बाबाची वारी देखील असते.
रत्नागिरी पोलिसात तो चालक म्हणून कार्यरत होता. विशेष म्हणजे त्यावेळीही तो बुवाबाजी करत असल्याचा आरोप आहे. पोलिस दलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने मठ स्थापन करुन हे उद्योग सुरु केले.
दिवसा पोलिसाची नोकरी आणि रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी बुवाबाजी. उत्कृष्ट भजनीबुवा आणि पखवाज वादक असलेला पाटील गेल्या दहा वर्षात बाबा म्हणून नावारुपाला आला.
या बाबानं आपल्याला अवार्च्च भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार एका महिलेनं दिली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनंही या बाबाच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
रत्नागिरीचा 'राम रहीम', पोलिसातून निवृत्त भोंदूच्या लीला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Sep 2017 08:12 AM (IST)
रत्नागिरी पोलिसात तो चालक म्हणून कार्यरत होता. विशेष म्हणजे त्यावेळीही तो बुवाबाजी करत असल्याचा आरोप आहे. पोलिस दलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने हे उद्योग सुरु केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -