एक्स्प्लोर
साताऱ्यात 15 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत
साताऱ्यात 15 वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या.

सातारा : साताऱ्यामध्ये लग्नाचं आमिष दाखवून 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी संदीप देशमुखला अटक करण्यात आली आहे. तक्रारीनुसार आरोपीनं लग्नाचं आमिष देऊन १५ वर्षाच्या मुलीवर अनेकदा बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहून तिनं एका बाळाला जन्मही दिला आहे. पीडितेला आई-वडील नसल्यानं हे प्रकरण दडपण्यासाठी तिच्या आजी-आजोबांवर बराच दबाव टाकण्यात येत होता. दोन दिवसापूर्वी पीडित मुलीनं घरातच बाळाला जन्म दिला. याबाबतची माहिती मेढा तहसिलदारांना समजल्यानंतर त्यांनी स्वत: मुलीची विचारपूस केली त्यानंतर मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी संदीप देशमुखला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















