जळगाव : शहरात सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे सर्वत्र सामसूम पसरल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच फायदा घेत एका तरुणाने भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका दहा वर्षीय बालिकेवर मुतारीत नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली होती. आरोपी आणि पीडित मुलगी घटनास्थळावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. मात्र, चित्रण ब्लर असल्याने आरोपीची ओळख पटवण्यात अडचण येत होती. मात्र, दोन लहान मुलांनी केलेल्या मदतीमुळे आरोपीला 24 तासांच्या आत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
शहरातील गोलानी मार्केट परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका दहा वर्षीय बालिकेला एका तरुणाने भीक देण्याचा बहाणा करीत गोलानी मार्केट मधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या मुतारीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. गोलानी मार्केट मधील एका दुकानाच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात सदर मुलगी आणि तरुण कैद झाले होते. मात्र, चित्रण स्पष्ट नसल्याने आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचण निर्माण झाली होती. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करताना त्या परिसरात आठ ते दहा वर्षांची भीक मागून उदरनिर्वाह करणारी दोन मुले पोलिसांना आढळून आली होती. पोलिसांनी त्यांना घटनेची माहिती विचारली असता संबंधित आरोपीचा ठाव ठिकाणाच त्यांनी दाखवला असे नाही तर प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार असल्याचंही सांगितल्याने पोलिसांना आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. या घटनेत सौरभ वासुदेव खर्डीकर या 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मदत केल्याचा पार्श्वभूमीवर पोलिसांनी या मुलांचा सन्मान करीत त्यांना बक्षीस ही दिले आहे.
मुंबईतील जे.जे रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड; आरोपी वॉर्डबॉयला अटक
अत्याचार होताना दोन अल्पवयीन बालके होती प्रत्यक्ष घटनेचे साक्षिदार
लॉकडाऊन काळात सर्वत्र शांतता असताना अत्याचार पीडित मुलगी एका तरुणाच्या सोबत निर्मनुष्य अशा तिसऱ्या मजल्यावर जात असल्याचं या बालकांनी पाहिलं आणि काही अंतर दूर राहून त्यांच्या मागोमाग ही मुलंही तिसऱ्या मजल्यावर पोहोचली. अत्याचार पीडित मुलगी आणि ही दोन्ही मुलेही भीक मागून उदरनिर्वाह करीत असल्याने ते एकमेकांना ओळखत असत. त्यामुळे या मुलीच्या सोबत असणारा तरुण कोण आणि ती त्याच्या सोबत थेट तिसऱ्या मजल्यावर का जात आहे याची उत्कंठा या मुलांना असल्यानेच ते त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मागे गेले होते. तरुणाने मुलीला मुतारीमध्ये नेल्याच लक्षात आल्यावर या दोन्ही बालकांनी मुतारीच्या बाहेरूनच कानोसा घेतला असता तरुण बालिकेवर अत्याचार करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं. मात्र, परिसरात कोणीही नसल्यानं त्यांनी ही घटना बघून न पाहिल्या सारख करून आपल्या खेळण्यात गुंग झाली होती.
आरोपीची पाय फेकत चालण्याची सवय पोलिसांच्या पथ्यावर
बलात्काराच्या या घटनेत पोलिसांना मार्केटमध्ये जे सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं. त्यात आरोपी आणि बालिका सोबत सोबत चालत असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, आरोपीचा चेहरा अस्पष्ट दिसत असल्याने शिवाय त्याने मास्क घातलेला असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांच्या दृष्टीने मोठं आव्हान ठरले होते. सीसीटिव्ही कॅमेरामध्ये आरोपीचा चेहरा जरी स्पष्ट दिसत नसला तरी चालताना तो पाय फेकत चालत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आले होते. गोलानी मार्केटमध्ये पाय फेकत जाणार एक तरुण नेहमीच येत असतो याची माहिती पोलीस घेत असतानाच परिसरात एका दुकानात काम करणाऱ्या तरुणाची माहिती पोलिसांना मिळाली होती.
गृहमंत्र्यांच्या नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; रस्त्यावर पळवत महिलेची हत्या
पोलिसांनी सदर तरुणास ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. त्यात त्यांना फारसं हाती काही लागलं नाही, शिवाय प्रत्यक्ष दर्शी मुलांनीही हा तो तरुण नसल्याचं सांगितल्याने त्याला पोलिसांनी सोडून दिलं होतं. मात्र, यावेळी त्याने पोलिसांना अतिशय महत्व पूर्ण माहिती देत आपल्या सारखाच काहीसा दिसणारा आणि पाय फेकत चालणारा एक तरुण मला माहीत आहे, असं सांगून त्या मुलांचं नाव आणि घराचा पत्ता पोलिसांना दिला.
या पत्त्यावर पोलीस पोहोचले असता आरोपी आपल्या परिवारासह जेवण करीत होता. पोलीस दारावर पोहोचल्याने आरोपीच्या पाया खालची वाळू सरकली, त्याच्या राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी त्याची विचारपूर सुरू केली. सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या सौरभ खर्डीकरच्या समोर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्ष साक्षीदार हजर केले आणि सौरभने पोपटा सारखा आपल्या पापाचा पाढा पोलिसांच्या समोर वाचून दाखवला.
सौरभ सध्या बेरोजगार आहे, त्याचे वडील आणि भाऊ चांगल्या कंपनीमध्ये उच्च पदावर आहेत. मात्र, सौरभच्या कृत्याने त्यांनाही मान खाली घालण्याची वेळ आली आहे. पीडित मुलगी आणि तिचा परिवार भीक मागून उदरनिर्वाह करीत असताना मुलगी एकटीच कुठेही फिरत असल्याच आरोपीला लक्षात आलं होतं. याच गोष्टीचा फायदा उठवत त्याने तिच्यावर अत्याचार केल्याच समोर आलं आहे.
आरोपी सापडला, भर भक्कम पुरावे ही मिळाले आहे. काळाच्या ओघात आरोपीला शिक्षा होईल. पण पीडितेच काय असा प्रश्न मात्र कायमस्वरूपी राहणार आहे. पोटासाठी भीक मागत असताना पुन्हा कोण्या सौरभची ती शिकार होणार नाही याची भीती मात्र कायम राहणार आहे. शासन स्तरावर या पीडित बलिकेच आणि तिच्या परिवाराचे पुनर्वसन व्हावे, अशी अपेक्षा आता सर्व सामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.
Jalgaon #Corona जळगाव जिल्ह्यात विवाह सोहळ्यादरम्यान नवरा-नवरीसह 16 जणांना कोरोनाची लागण