एक्स्प्लोर
Advertisement

लग्नाचं आमिष दाखवून दोन मित्रांचा 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार

बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून दोघा मित्रांनी 17 वर्षाच्या युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला आपल्या मित्राच्या हवाली पैशासाठी केले. नंतर त्या नराधमाने दोन महिने तिला कोंडून ठेवून सतत दोन महिने तिच्यावर बलात्कार केला.
खानापूर तालुक्यातील नागुर्डावाडातील गोपाळ पुन्नाप्पा पारवाडकर आणि बलराम अशोक नाईक या दोघांनी 20 जून युवतीला फूस लावून नेले आणि तिच्यावर जंगलातील एका झोपडीत बलात्कार केला.
एक दिवस एक रात्र त्या झोपडीत त्या दोन नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी त्या दोघांनी त्यांचा मित्र रमेश मल्लिकार्जुन चौगला याला बोलावले. त्यानेही तिच्यावर झोपडीत अत्याचार केले आणि नंतर तिला बेळगावमधील आझमनगर येथे आणून एका खोलीत कोंडून ठेवले.
21 जूनपासून रमेशने तिच्यावर मागील आठवड्यापर्यंत अत्याचार केले. युवतीच्या पालकांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची खानापूर पोलिसात तक्रार दिली होती . पोलिसांना सदर युवती बेळगावात असल्याचा धागा मिळताच, त्यांनी रमेशच्या खोलीतून तिची सुटका केली.
दरम्यान, रमेशला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोघांना लवकरच जेरबंद करण्यात येईल असा विश्वास पोलिसानी व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
