अहमदनगर : बोलायचं होतं वेगळं आणि बोलले भलतंच, असंच काहीसं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याबाबतीत घडलं. अहमदनगरमधील सभेत रावसाहेब दानवे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर टीका करताना, पंतप्रधान मोदींचं नाव घेतलं.


अहमदनगरमधील सभेत रावसाहेब दानवे भाषणात काँग्रेसचा समाचार घेत होते. यावेळी दानवेंनी नरेंद्र मोदी आणि डॉ. मनमोहन सिंह यांची तुलना केली. दानवेंना मनमोहन सिंह यांच्यावर टीका करायची होती. मात्र टीका करताना त्यांनी मनमोहन सिंहांऐवजी पंतप्रधान मोदींचं नाव घेतलं आणि सभेत जमलेल्या लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

रावसाहेब दानवे म्हणाले की, "मी 20 वर्षे लोकसभेत होते. मनमोहन सिंह 10 वर्ष पंतप्रधान होते. लोकसभेत पाय ठेवल्यावर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींकडे पाहायचो. ते आज तरी हसतात का, उद्या तरी हसतात का, परवा तरी हसतात का. मी देवाची शपथ घेऊन सांगतो की, 10 वर्षात मी एकदाही मनमोहन सिंहांना हसताना पाहिलं नाही. मी  एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करतो, मला त्यांचा हसलेला फोटो आणून द्या."

पाहा व्हिडीओ