एक्स्प्लोर
रावसाहेब दानवेंची शिवसेना आमदारासोबत बंद दाराआड तासभर चर्चा
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि कंधार-लोहा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची बंद दाराआड तासभर झालेली चर्चा, सध्या चर्चेचा विषय आहे.

नांदेड: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि कंधार-लोहा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची बंद दाराआड तासभर झालेली चर्चा, सध्या चर्चेचा विषय आहे. रावसाहेब दानवे हे मनपा निवडणूक आढाव्याच्या निमित्ताने नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सोमवारी शिवसेना आमदार चिखलीकर यांची भेट घेतली. चिखलीकरांच्या निवासस्थानी चहाच्या निमित्ताने या दोघांची भेट झाली. मात्र हे चहापान बंद दाराआड सुमारे तासभर सुरु होतं. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली, मात्र चर्चेचा तपशील राजकीय नव्हता असं गोलगोल उत्तर दोघांनीही दिलं. यावेळी रावसाहेब दानवे यांच्यासोबत भाजपचे नांदेड मनपा निवडणूक प्रभारी आणि राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर, आमदार सुजितसिंह ठाकूर यांचीही उपस्थिती होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
निवडणूक























