एक्स्प्लोर

ठाकरेंची ही शेवटची निवडणूक, निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत, रावसाहेब दानवेंचा दावा 

भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)  यांनी उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) जोरदार टीका केली आहे.

Raosaheb Danve on Uddhav Thackeray : भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)  यांनी उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) जोरदार टीका केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले की, मागच्या निवडणुकीचा मी साक्षीदार आहे, तेव्हा मी अध्यक्ष होतो. मागच्यावेळी एकत्र सरकार चालवत असल्यामुळं आम्ही त्यांना पालिका दिली होती. नाहीतर आम्ही आमचा महापौर बसवला असता असे दानवे म्हणाले. ठाकरेंची ही निवडणूक शेवटची आहे, निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत. कार्यकर्ते आपलं आपलं भविष्य स्वीकारतील असे दानवे म्हणाले. 

नवाब मलिक यांनी जेलमध्ये गेले तरी राजीनामा दिला नव्हता, पण माणिकराव यांनी दिला

माणिकराव कोकाटे यांच्याबाबतही त्यांना विचारण्यात आले. यावेळी दानवे म्हणाले की, त्यांनी राजीनामा दिला आहे. अजित पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही हे आमच्या सरकारने दाखवून दिल्याचे दानवे म्हणाले. नवाब मलिक यांनी जेलमध्ये गेले तरी राजीनामा दिला नव्हता, पण माणिकराव यांनी राजीनामा दिल्याचे दानवे म्हणाले. काल त्यांचा निकाल झाला आणि ते अॅडमिट झाले होते. जे झालं ते नियमाने झाल्याचे दानवे म्हणाले. 

धनंजय मुंडे यांच्याबाबत सुप्रिया सुळे यांची दुश्मनी असण्याचं काय कारण ?

धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार का? याबाबत देखील विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, या सगळ्या बातम्या आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील. हा निर्णय मी घेऊ शकत नाही असे दानवे म्हणाले. धनंजय मुंडे यांच्याबाबत सुप्रिया सुळे यांची दुश्मनी असण्याचं काय कारण आहे? असा सवाल देखील दानवेंनी केला. 75 वर्षात सुप्रिया सुळे यांनी कधीच उपोषण केलं नव्हते. उपोषण करण्याची पाळी सुप्रिया सुळे यांच्यावर अनेक वेळा येणार आहे असेही दानवे म्हणाले. 

राज्यात 29 महानगरपालिकांच्या निडणुकांचे बिगुल वाजले

राज्यात 29 महानगरपालिकांच्या निडणुकांचे बिगुल वाजले आहे. 15 जानेवारीला यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मोठ्या प्रमाणात सध्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा पक्षाला रामराम, लवकरच भाजपमध्य प्रवेश 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget