राजवाडी होळी
आदिवासी समाजातील महत्वाचा राजवाडी होळी सण हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत पार पडलाय. नंदुरबार जिल्ह्यात सातपुडामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी ही मोठ्या थाटात साजरी करण्यात आलीय. 1246 पासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही आपलं एकतेचं आणि समानतेचं वैविध्य टिकवून आहे.
भिवंडीत होळीला 85 वर्षांची परंपरा
भिवंडीत कोळी बांधवांच्या होळीला 85 वर्षांची जुनी परंपरा आहे. शहरीकरणाने आणि लोकसंख्येने भिवंडी शहर वाढत असतानाच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोळी समाजाच्या भोईवाडा या ठिकाणी आज ही पारंपारीक होळी साजरी केली जाते. भोईवाड्यात कोळी बांधव महिला पुरुष संपुर्ण परिसरात वाजतगाजत होळीत जाळल्या जाणाऱ्या मुख्य लाकडाची साडीचोळी घालून मिरवणूक काढून होळी दहन ठिकाणी आणली जाते. त्या ठिकाणी कोळी बांधवांकडून होळीला पापलेट, सुरमई लटकवल्या जातात. त्यानंतर सर्व महिला होळीची पूजा करून पंच मंडळींकडून होळी दहन केली जाते.
बीडच्या विडा गावातील अनोखी प्रथा, धुलिवंदनाला जावयाची गाढवावरुन मिरवणूक
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची होळी
कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये आगळी वेगळी होळी साजरी करण्यात आली. जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची होळी पेटवण्यात आली. देहू रोड येथील आधार रुग्णालयाने या कोरोना होळीचं आयोजन केलं होतं.
रत्नागिरीतील लांजामध्ये श्री रामाची होळी
रत्नागिरीतील लांजा इथंही मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. लांजामध्ये श्री रामाची होळी प्रथम निघते. रामाच्या होळीचे खेळे विठलाई मंदिरापर्यंत तीन फेरे मारून होळी विठ्ठलाई मंदिराजवळ ठेऊन सर्व निशाण घेऊन चव्हाट्याच्या होळीकडे जातात. रामाचे निशाण, केदारलिंगाचे निशाण, पाचाचे निशाण, जिगाईचे निशाण एकत्र आल्यावर गावातील मुख्य मानकरी गावकऱ्यांना होळी संदर्भात आव्हान केल्यावर वाजत गाजत चव्हाट्याची होळीचे खेळे निघतात. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पाच पाच प्रदक्षणा मारल्यावर होळी ठेवली जाते. नंतर रामाच्या होळीचे खेळे रामाची होळी घेऊन दोन प्रदक्षणा पूर्ण करत रामाच्या मांडवर होळी ठेवली जाते. त्यानंतर विठ्लची होळी आणली जाते. दरम्यान, रात्री उशिरा सर्व होळ्या उभारल्या जातात.
होळीकरीता झाडे तोडल्यास धुलिवंदन तुरुंगात साजरे करावे लागणार!
चायनीज रंगांला 'नो'
जगभर कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता यंदा मुंबईसह महाराष्ट्रात नागरिकांनी चायनीज रंगांची उधळण टाळली आहे. अनेकठिकाणी नागरिकांनी होळीसाठी पाण्याचा देखील वापर टाळला आहे. परंतु आपला पारंपरिक सण काही जणांनी वेगळ्या पद्दतीने साजरा केलाय. गिरगावच्या ज्येष्ठ नागरिकांच्या क्लबने यंदा चायनीज रंगांऐवजी वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्यांचा रांगासाठी वापर केला आहे. क्लबचे वैशिष्ट्य म्हणजे क्लबच्या मार्फत प्रत्येक वर्षी इको फ्रेंडली होळी साजरी करण्यात येते. या क्लबचे जवळपास 100 सदस्य आहेत.
बेळगावात शंभर वर्षांची परंपरा
शंभर वर्षांपासून अश्वत्थामा मंदिरासमोर धुलीवंदनाच्या दिवशी लोटांगण घालण्याची परंपरा आहे. बेळगावच्या पांगुळ गल्लीत असणारे दक्षिण भारतातील अश्वत्थामा मंदिर एकमेव आहे. संपूर्ण भारतात देखील अश्वत्थामाची मोजकीच मंदिरे आहेत. शेकडो भक्त रस्त्यावर लोटांगण घालून आपली मागणी पूर्ण होण्याची प्रार्थना करतात. तर काही जण मागणी पूर्ण झाल्याबद्दल लोटांगण घालतात. लोटांगण घालत असताना गल्लीतील नागरिक पाणी मारत असतात. काही जण रंग उडवत असतात. केवळ बेळगाव नव्हे तर कर्नाटकातील अनेक भागातून, गोव्यातून आणि महाराष्ट्रातून भक्तजन अश्वत्थामा मंदिरासमोर लोटांगण घालण्यासाठी येतात.
Navneet Rana | खासदार नवनीत राणा यांचं पतीसोबत आदिवासी कोरकू नृत्य | ABP Majha