एक्स्प्लोर
नागपुरातील कार्यक्रमात रामदास आठवले झोपले होते की रागात होते?

फोटो सौजन्य - दैनिक भास्कर
नागपूर : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. नागपुरातील मनकापूर येथील कार्यक्रमातील हा फोटो असल्याची माहिती मिळते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मनकापुरात नीती आयोगाचा कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमाआधी पंतप्रधान मोदी कोराडीमधील पॉवर प्लान्टच्या अधिकाऱ्यांकडून तांत्रिक माहिती समजून घेत होते. तेव्हा पंतप्रधान मोदींसह उपस्थित सर्व मंत्र्यांना बसण्यासाठी खुर्ची मिळाली होती. केवळ रामदास आठवले आणि हंसराज अहिर या दोन केंद्रीय मंत्र्यांना बसण्यासाठी खुर्ची न मिळाल्याने ते पूर्णवेळ उभे होते.
फोटो सौजन्य - दैनिक भास्कर कोराडीनंतर पंतप्रधान आणि इतर सर्वजण मनकापुरात कार्यक्रमासाठी आले. त्यावेळी कोराडीत बसण्यासाठी खुर्ची न मिळाल्याच्या रागातून रामदास आठवले कार्यक्रम संपल्यानंतरही बसूनच होते, अशीही चर्चा आहे. मात्र, दुसरीकडे अशीही चर्चा आहे की, मनकापुरातील कार्यक्रमात रामदास आठवले व्यासपीठावर बसल्या बसल्याच झोपी गेले. त्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना उठवले.
फोटो सौजन्य - दैनिक भास्कर कोराडीनंतर पंतप्रधान आणि इतर सर्वजण मनकापुरात कार्यक्रमासाठी आले. त्यावेळी कोराडीत बसण्यासाठी खुर्ची न मिळाल्याच्या रागातून रामदास आठवले कार्यक्रम संपल्यानंतरही बसूनच होते, अशीही चर्चा आहे. मात्र, दुसरीकडे अशीही चर्चा आहे की, मनकापुरातील कार्यक्रमात रामदास आठवले व्यासपीठावर बसल्या बसल्याच झोपी गेले. त्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना उठवले. Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















