मुंबई : महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच धर्मियांच्या सण, उत्सवांवर निर्बध आणले आहेत. मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजानचा महिना चंद्रदर्शनानुसार 13 किंवा 14 एप्रिलपासून सुरु होणार आहे. राज्यशासनाने आधी जाहीर केलेल्या निर्णयानुसार कोणत्याही धार्मिक स्थळ आणि प्रार्थना स्थळात एकत्रित येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील रमजानमध्ये मशिदीत सामूहिक नमाज पठण होणार नाही. राज्य शासनाने रमजानसाठी  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 


यामध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसंच इफ्तारसाठी मशिदीमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी एकत्र नयेता धार्मिक कार्यक्रम आपल्या घरातच साजरे करावेत, नमाज पठणाकरता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये, असं सांगण्यात आलं आहे.  


सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 जणांपेक्षा अधिक व्यक्तिंनी एकत्र येऊ नये. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करुन रमजानचा महिना अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा, असं सांगण्यात आलं आहे.


असे आहेत नियम