अहमदनगर : एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. मात्र या माध्यमातून सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप भाजपचे उपाध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे. 70 हजार कोटींची सिंचन घोटाळ्याची ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. एकनाथ खडसे हे यातील प्रमुख साक्षीदार आहेत, त्यामुळे प्रमुख साक्षीदार राष्ट्रवादीने फोडल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक

यावेळी बोलताना राम शिंदे यांनी जयंत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत असे जयंत पाटील यांनी सांगितले होते. मात्र एकही आमदार त्यांच्या सोबत गेला नाही असे म्हणत राष्ट्रवादी पक्षात कोणतीही भरती होणार नाही असे स्पष्टीकरण राम शिंदे यांनी दिले आहे.

... म्हणून राष्ट्रवादीतच जाण्याचा निर्णय घेतला, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण

राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांचा देखील खरपूस समाचार घेतला. विधानसभा निवडणूक होऊन 1 वर्ष झाले मात्र 1 वर्षात रोहित पवार यांनी फक्त कोंबड्यांची पिल्ले, मासे आणि बी बियाणे इकडे आणून विकले, यापलीकडे कोणताही विकास केला नाही असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. रोहित पवार हे समाजकारण करण्यासाठी नाही तर धंदा करण्यासाठी आले आहेत, अशी टीका देखील राम शिंदे यांनी केली आहे. निवडणुकीत पवार घराण्याचा उमेदवार होता, त्यामुळे बारामती पॅटर्नची खूप चर्चा झाली. मात्र एक वर्षानंतर बारामती पॅटर्न सपशेल अपयश ठरला असून लोकांची घोर निराशा झाली आहे, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. महत्त्वाच्या बातम्या :