नंदुरबार : घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा खडसेंचे कट्टर समर्थक असलेले माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला, असं एकनाथ खडसेंनी सांगितल्याचं उदेसिंग पाडवी यांनी म्हटलं आहे. ते नंदुरबारमध्ये बोलत होते.


दरम्यान, उदेसिंग पाडवी यांच्या या दाव्यावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.


आपण एकनाथ खडसे यांच्या आदेशाने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं शहादा तळोदा मतदारसंघाचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी सांगितलं. ते म्हणाले की, एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली असून घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यांना राष्ट्रवादीत योग्य मानसन्मान मिळणार असून त्यांच्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होणार आहे. तसंच खडसेंना राज्याच्या मंत्रिमंडळातही स्थान मिळणार असल्याचे पाडवी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.



उदेसिंग पाडवी यांनी सांगितलं की, "सोमवारी नाथाभाऊंना भेटण्यासाठी मुक्ताईनगरला गेलो. यावेळी त्यांना राष्ट्रवादीत जाण्याबाबत काय ठरलं अशी विचारणा केली. त्यावर पॉझिटिव्ह चर्चा झाली. माझ्या मनासारखी चर्चा झाली आहे. येत्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला निश्चितपणे मी प्रवेश करेन. जेव्हा प्रवेश करेन तेव्हा उपस्थित राहावं अशी विनंती तुला आहे, असं ते म्हणाले."


उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?


थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका, चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंना भावनिक साद


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात...


काही दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बातमी समोर आली होती. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चाही झाल्याचं म्हटलं जात होता. हा बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याची चर्चा रंगली होती. शिवाय एकनाथ खडसे पक्षावर नाराज असल्याचंही वारंवार समोर आलं आहे.


Eknath Khadse | स्पेशल रिपोर्ट | नाराज एकनाथ खडसे हाती घड्याळ बांधणार का?