Raju Shetti : सध्या राज्यातील शेतकरी प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्य सरकारवर चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळं राजू शेट्टी (Raju Shetti) महविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 5 एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे सूतोवाच देण्यात आले आहेत. दरम्यान, विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या यादीत आमदार व्हायचं की नाही हेही पाच तारखेला ठरणार आहे.


येत्या 5 एप्रिल स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. राज्या भविष्यात आघाडीचं राजकारण करायचं की नाही याचा देखील गंभीर विचार या बैठकीत करण्यात येणार आहे.


शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, खासगी कंपन्यांकडून सरकार वीज खरेदी करत नाही. दिवसा वीज द्यावी ही पक्षाची मागणी असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. महाविकास आघाडीला पाठींबा द्यायचा कि नाही याबाबतचा निर्णय 5 एप्रिल रोजी घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, 22 मार्चला दिल्लीत देशातील सर्वच शेतकरी संघटना बैठक झाली. शेतकऱ्यांना हमी भाव देणारा कायदा करुन घेण्यासाठी आता पुढचा लढा असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले. 


सध्या हरभरा हमी भावपेक्षा कमी दरानं खरेदी केला जात आहे. ऊस तोडणी मजूर पेटवून ऊस तोडत आहेत. हे बरोबर नसल्याचेही शेट्टी म्हणाले. हमी भावाच्या संदर्भात 1 मे रोजी गावसभेत ठराव घेणार असल्याचं त्यांनी सांगितले. राजू शेट्टींनी गेल्या आठवड्यातही महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय सामुदायिक होता. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी तयार झाली, त्याचं काय झालं? अनेक मुद्दे खटकणारे आहेत. नवीन धोरण राबवताना संवादही साधला नाही. 


महत्त्वाच्या बातम्या: