एक्स्प्लोर

GST विरोधात देशव्यापी आंदोलन छेडणार: राजू शेट्टी

GST विरोधात देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. मूठभर उद्योजकांसाठी देशातील शेतकऱ्यांना संपण्याचा केंद्र सरकारचं धोरण असून शेतकऱ्यांना मारक ठरणाऱ्या GST विरोधात देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. ते कोल्हापुरात बोलत होते. “केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्याविरोधात कुरापती सुरुच ठेवल्या आहेत. शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीसाठी ट्रॉली खरेदीवर 28 टक्के GST आकारण्यात येणार आहे, तर आलिशान मर्सिडीज कारवर 5 टक्के GST आकारण्यात येणार आहे. मूठभर उद्योजकांसाठी देशातील शेतकऱ्यांना संपवण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे” असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांना मारक ठरणाऱ्या GST विरोधात देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिलाय. अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा शेतात औषध फवारणी करताना 33 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांचा मृत्यू हा शासन आणि अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळं झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी शासन आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी मागणीही शेट्टी यांनी केली. चेंगराचेंगरीतील मृतांना 5 लाख, मग शेतकऱ्यांना 2 लाख का? मुंबईतील रेल्वे पुलावरील झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या मृतांना 5 लाखांची मदत देण्यात आली. मात्र मृत शेतकऱ्याला 2 लाखांची मदत दिली. शेतकरी पण माणूस आहे. त्यामुळं  शेतकऱ्यांसाठी हा भेदभाव का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ऊस परिषद होणारच 28 ऑक्टोबरच्या 16 व्या ऊस परिषदेत जो दर ठरेल तो साखर कारखान्यांना द्यावा लागेल. या ऊस परिषदेला लाखोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित राहतात. कोण नसल्याने ऊस परिषदेवर कोणताही परिणाम होत नाही. तसंच जोवर शेतकरी ऊस परिषदेला येतात तोपर्यंत ऊस परिषद सुरूच राहील असा म्हणत त्यांनी रघुनाथ पाटील यांचं नाव न घेता टोला लगावला. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शासनाने केली असं स्वतः शासन म्हणतंय, पण प्रत्यशात मागील 4 दिवसांत एकही शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे ही शेतकरी अपमान योजना आहे, असं शेट्टी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा निकाल, नराधम भीमराव कांबळे दोषी
Maharashtra Live blog updates: नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा निकाल, नराधम भीमराव कांबळे दोषी
Devendra Fadnavis on Sanjay Dina Patil: कोणाचंही घर बॉम्बने उडू देणार नाही, धमक्या देणाऱ्यांना पोलीस योग्य उत्तर देतील: देवेंद्र फडणवीस
कोणाचंही घर बॉम्बने उडू देणार नाही, धमक्या देणाऱ्यांना पोलीस योग्य उत्तर देतील: देवेंद्र फडणवीस
Nashik News: महापालिकेच्या शिबिरात लस घेतली अन् काही मिनिटांतच खाली कोसळली; नाशिकमध्ये 17 वर्षीय श्रावणीचा दुर्दैवी अंत
महापालिकेच्या शिबिरात लस घेतली अन् काही मिनिटांतच खाली कोसळली; नाशिकमध्ये 17 वर्षीय श्रावणीचा दुर्दैवी अंत
Gadchiroli News: तापाच्या रुग्णाला आरोग्य यंत्रणेकडे पाठवणाऱ्या पुजाऱ्याला मिळणार 200 रुपये भत्ता; 'या' जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
तापाच्या रुग्णाला आरोग्य यंत्रणेकडे पाठवणाऱ्या पुजाऱ्याला मिळणार 200 रुपये भत्ता; 'या' जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
Singer Alka Yagnik On Wheelchair Video: पद्म भूषण सम्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
पद्म भूषण सम्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
Kalpana Kharat: अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं प्रकरण काय?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं प्रकरण काय?
Ketan Agrawal Crime Case : सिया गोयलचे फक्त चेतनशी नव्हे तर इतर मुलांशी अश्लील चॅटिंग, अनैतिक संबंध? केतन अग्रवालच्या वडिलांचा गंभीर आरोप
सिया गोयलचे फक्त चेतनशी नव्हे तर इतर मुलांशी अश्लील चॅटिंग, अनैतिक संबंध? केतन अग्रवालच्या वडिलांचा गंभीर आरोप
MVA Meeting: कोणाचं वैयक्तिक काम, कोणाची तब्येत बिघडली, मविआचं टेन्शन वाढलं; बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
कोणाचं वैयक्तिक काम, कोणाची तब्येत बिघडली, मविआचं टेन्शन वाढलं; बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: सियाने क्रिकेटर बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट धरला, पण घराणं तोलामोलाचं नसल्याने गोयल कुटुंबाने चेतनला नाकारलं
सियाने क्रिकेटर बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट धरला, पण घराणं तोलामोलाचं नसल्याने गोयल कुटुंबाने चेतनला नाकारलं
Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...
पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...
Ketan Agrawal Death :
"माझा मुलगा निर्दोष, त्याला बळजबरीने..."; केतन अग्रवाल प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीच्या वडिलांचा खळबळजनक दावा
Embed widget