Rajpal Yadav On Majha Katta : माझी उंची कमी असल्याने माझी थट्टा केली जायची, पण त्या लोकांची मला कीव यायची, कारण सचिन तेंडुलकर आणि चॅर्ली चॅप्लिन हे माझे हिरो आहेत, त्यांच्याप्रमाणे माझ्या मिशनमध्ये स्पष्टता आहे असं सिनेअभिनेता राजपाल यादवने (Rajpal Yadav) सांगितलं. मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, आणि जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीचा अधिक सन्मान करण्याची प्रवृत्ती माझी आहे असं त्याने सांगितलं. मुंबईत आल्यानंतर आपण सिरीयलपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्व प्रकारचा अभिनय केला, मुंबईने मला जगायला शिकवलं असंही तो म्हणाला. राजपाल यादवने एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली. त्यावेळी त्याने दिलखुलास संवाद साधला. 


सचिन तेंडुलकर आणि चॅर्ली चॅप्लिन हे माझे हिरो 


सचिन तेंडुलकर आणि चॅर्ली चॅप्लिन या दोघांना मी मानतो असं सांगत राजपाल यादव म्हणाला की, अभिनयाची निवड करण्यासाठी तुमच्याकडे स्पष्टता असायला हवी. मी चॅर्ली चॅप्लिनचा अभिनय असलेला द ग्रेट डिक्टेटर हा चित्रपट पाहिला. त्यानंतर क्रिएटिव्हीटीची एक मूर्ती मानली. त्यांची उंची कमी असली तरी त्यांचा अभिनय हा माऊंट एवरेस्टच्या उंचीचा होता. साडे फुटाचा मॅग्राथला कमी उंचीच्या सचिनने त्याच्या डोळ्यात पाहून अनेक चौके मारले. सचिनवर अनेकदा टीका केली पण त्याने जे काही केलं, जो काही संयम ठेवला ते मोठा होता. सचिनने 100 शतकं मारली, विश्वचषक पण जिंकून दिला. 


कमी उंची असल्याने शाळेत पुढे 


कमी उंची असल्याने मला शिक्षक शाळेत सर्वात पुढे बसवायचं असं सांगत राजपाल यादवने त्याच्या आयुष्यातील मजेदार किस्सा सांगितला. तो म्हणाला की, लहान असताना माझी उंची कमी होती. त्यावेळी मला शाळेत सर्वात पुढे उभं केलं जायचं. त्यावेळी मला असं वाटायचं की मला सन्मान दिला जातोय. पण उंची कमी असल्याने शिक्षक असं करायचे हे नंतर कळालं. 


आपल्या उंचीवरून अनेकदा आपल्याला बोलण्यात आलं, त्यांच्यावर मला तरस वाटतो. ज्याचं मिशन स्पष्ट आहे तो यशस्वी होतो हे सचिन आणि चॅर्ली चॅप्लीनच्या उदाहरणावरून दिसतंय असं राजपाल यादव म्हणाला. 


चित्रपट प्रदर्शित झाला आणि गाव दत्तक घेतलं 


लहान असताना गावात काहीच सुविधा नव्हत्या, त्यावेळी कुणाच्याही घरात बाथरूमची सोय नसल्याचं राजपाल यादवने सांगितलं. त्यावेळी मी ठरवलं होतं की गावाचा चेहरा बदलायचा असंही त्याने सांगितलं. 2005 साली जंगल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिलं काम काय केलं असेल तर ते म्हणजे गावाला दत्तक घेतल्याचं असं राजपाल यादवने सांगितलं. त्यानंतर त्या गावात अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, आज त्या गावात प्रत्येकाकडे बाथरूम असल्याचं राजपालने सांगितलं. 


मी सर्वांचं ऐकतो, मी गुड लिसनर असल्याचं राजपाल यादवने सांगितलं. 


ही बातमी वाचा: